किमान तापमान : 26.73° से.
कमाल तापमान : 26.9° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.19 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.9° से.
24.55°से. - 27.39°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलफिरोजपूर, १३ जानेवारी – उत्तरप्रदेशात भाजपाच्या आमदारांची गळती सुरूच असून, आतापर्यंत १४ मंत्री, आमदारांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. आज गुरुवारी आयुष मंत्री धर्मसिंह सैनी, शिकोहाबाद विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ. मुकेश वर्मा, बिधुनातील आमदार विनय शाक्य यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अनुसूचित जाती व जमातीला भाजपात आदर दिला जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशात तीन मंत्र्यांसह एकूण ११ आमदारांनी मागील तीन दिवसांत राजीनामे दिले आहेत. अनुसूचित जाती व जमातीकडे दुर्लक्ष होत आहे, दुकानदार, लघु उद्योजकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे वर्मा यांनी उत्तरप्रदेशातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. धर्मसिंह सैनी समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजीनामा दिल्यानंतर सैनी यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली. आणखी दोन मंत्री आणि भाजपाचे १४ आमदार राजीनामा देऊ शकतात, असा दावा धर्मसिंह सैनी यांनी केला.