किमान तापमान : 25.39° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.15 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.79° से.
24.34°से. - 28.79°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.15°से. - 28.48°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर साफ आकाशजलपायगुडीजवळ घडली दुर्घटना,
कोलकाता, १३ जानेवारी – पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बिकानेर-गुवाहाटी एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना घडली. गुवाहाटीहून जाणार्या बिकानेर एक्स्प्रेसचे उत्तर बंगालमधील कुचबिहार आणि जलपाईगुडी दरम्यान दोमोहनीजवळ मायागोरी येथे हा अपघात झाला असून, यात किमान पाच प्रवासी ठार झाले तर ४० जण जखमी झाले आहेत.
या अपघातात एकूण बारा डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची तीव्रता पाहता मृत्युमुखी पडणार्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात होताच घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले.
उलटलेल्या डब्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी अडकले असू,न अनेक जखमी झाले आहेत. या गाडीत १२०० पेक्षा जास्त प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
बिकानेर एक्सप्रेस मंगळवारी रात्री राजस्थानमधील बिकानेर येथून निघाली होती. रात्री साडेबारा वाजता ही गाडी गुवाहाटीला पोहोचणार होती.
या भीषण रेल्वे अपघाताची रेल्वे मंत्रालयाने दखल घेतली आहे. या प्रकरणी रेल्वेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताची भीषणता पाहता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव स्वत: घटनास्थळी भेट देणार असल्याचे वृत्त आहे. रेल्वेने यासंदर्भात ०३६१२७३१६२२, ०३६१२७३१६२३ हे हेल्पलाइन नंबरही जारी केले आहेत.
पाटणा रेल्वे स्थानकावरून या एक्स्प्रेसमध्ये ९८ प्रवासी चढले होते तर, तीन प्रवासी मोकामा आणि दोनजण बख्तीयारपूर येथून चढले होते, अशी माहिती पाटण्यातील रेल्वे अधिकार्याने दिली. मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके रवाना करण्यात आले असून, त्यांनी बचावकार्य सुरू केले असल्याची माहिती एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल यांनी दिली.
मृतांना पाच लाख, जखमींना एक लाखांची मदत
अपघातात मृत्युमुखी झालेल्यांच्या कुटुंबांना पाच लाखांची, तर जखमींना एक लाख रुपये सानुग्रह राशीची घोषणा करण्यात आली. किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी केली ममता बॅनर्जींसोबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबाबत रेल्वे मंत्रालयाकडून माहिती घेतली. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून आवश्यक ती सर्व मदत पुरविण्याचे आश्वासन दिले.
रेल्वेमंत्री आज घटनास्थळी जाणार
जलपाईगुडीमधील अपघाताची भीषणता पाहता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपण स्वत: शुक्रवारी सकाळी तातडीने घटनास्थळी भेट देणार असल्याचे सांगितले आहे. सोबतच अपघातातील बचावकार्याकडे जातीने लक्ष देत असल्याचेही म्हटले आहे.