किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलउत्तरप्रदेशसाठी भाजपाची १०७ उमेदवारांची यादी जाहीर,
नवी दिल्ली, १५ जानेवारी – उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज शनिवारी १०७ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर या आपल्या पारपंरिक मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना प्रयागराजच्या सिराथूमधून उमेदवारी मिळाली आहे.
भाजपाचे उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान, राष्ट्रीय महासचिव अरुणसिंह आणि माध्यमविभागाचे प्रमुख अनिल बलुनी यांनी आज भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत भाजपा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या यादीत पहिल्या टप्प्यातील ५८ पैकी ५७ तर दुसर्या टप्प्यातील ५५ पैकी ४८ मतदारसंघातील भाजपा उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. पहिल्या दोन टप्प्यात निवडणुका होणार असलेल्या या भागात भाजपाचे ८३ आमदार होते, यातील ६३ जणांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
भाजपाने २० विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली असून, २१ नवीन चेहर्यांना प्रथमच उमेदवारी दिली आहे. ओबीसी आणि दलित समाजाच्या ६० टक्के उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. या यादीत ओबीसी समाजाच्या ४४, अनुसूचित जातीच्या १९ उमेदवारांचा समावेश आहे. १० महिलांनाही उमेदवारी दिली आहे. योगी आदित्यनाथ गोरखपूर या आपल्या पारपंरिक मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहे. आदित्यनाथ यंदा अयोध्येतून विधानसभा निवडणूक अशी चर्चा सुरू झाली होती.
पण ही चर्चा चर्चाच राहिली. माजी राज्यपाल बेबी रानी मौर्या आग्रा ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. श्रीकांत शर्मा यांना मथुरा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. गाजियाबादमधून अतुल गर्ग, नोएडामधून पंकजसिंह तर सरधनामधून संगीत सोम भाजपाचे उमेदवार राहणार आहेत.