किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, १८ जानेवारी – पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून आम आदमी पक्षाने विनोदी कलाकार असलेल्या खासदार भगवंत मान यांच्या नावाची आज मंगळवारी घोषणा केली. ढोलनगार्याच्या ताशात आपच्या कार्यकर्त्यांनी भगवंत मान यांच्या निवडीचे जोरदार स्वागत केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंजाब विधानसभा निवडणुकीत आपचे मुख्यमंत्रिपदाच उमेदवार म्हणून भगवंत मान यांच्या नावाची घोषणा केली. आपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा लोकांमधून असेल, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली होती. आजचा दिवस पंजाबसाठी ऐतिहासिक आहे, आपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण, असा प्रश्न मला वारंवार विचारला जात होता. आज त्याचे उत्तर मिळाले. भगवंत मान हे आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. २१ लाख ५९ हजार लोकांनी आमच्याकडे संदेश पाठवले होते, त्यातील ९३ टक्के लोकांची पसंती भगवंत मान यांच्या नावाला होती, असे केजरीवाल म्हणाले.
संगरुर लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये सलग दुसर्यांदा मान खासदार म्हणून निवडून आले. मनप्रीतसिंग बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीतून मान यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. २०१२ मध्ये मान यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती; मात्र त्यांचा पराभव झाला. नंतर मान यांनी आपमध्ये प्रवेश केला.
मान यांचा संगरुर लोकसभा मतदारसंघ पंजाबच्या मालवा प्रांतात येतो. जो मालवा जिंकतो, तो पंजाबची निवडणूक जिंकतो, असे म्हटले जाते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आपने पंजाबमध्ये दुसर्या क्रमांकाच्या २० जागा जिंकल्या होत्या.
कॉंगे्रसचे सरकार फक्त भूमिपूजन करते : धामी
डेहराडून – कॉंगे्रसचे सरकार फक्त कोणत्याही विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमापुरतीच मर्यादित असते. त्यानंतर या पक्षाला त्याचा विसर पडतो. तिथेच, भाजपा विकास प्रकल्प पूर्णत्वास कसा जाईल, याकडे अखेरपर्यंत लक्ष देत असतो, अशी टीका उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी आज मंगळवारी केली.
राज्यात मागील पाच वर्षांच्या काळात भाजपा सरकारने अनेक विकास प्रकल्प पूर्ण केले. मात्र, या सर्व कामांचे श्रेय कॉंगे्रस पक्ष स्वत:ला देत आहे. त्यांनी फक्त भूमिपूजन केले. त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले. भाजपाने मात्र सर्व प्रकल्प मार्गी लावले. सोबतच, राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपाने ज्या कामांचे भूमिपूजन केले, तेदेखील जवळजवळ पूर्ण होत आलेले आहेत. केंद्र सरकारने राज्याच्या सर्वांगिण विकासाकरिता दीड लाख कोटी रुपयांचे विकास प्रकल्प मंजूर केले आहेत.
केदारनाथ येथील बांधकामाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आणि तिसर्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. याशिवाय, बद्रीनाथ येथील विकास प्रकल्पही वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.