किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलसमाजवादी पक्षाला बसला मोठा झटका,
नवी दिल्ली, १९ जानेवारी – समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायमसिंह यादव यांची लहान सून अपर्णा यादव यांनी आज बुधवारी भाजपात प्रवेश केला. अपर्णा यादव यांच्या भाजपा प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे.
अपर्णा यादव यांनी आज दिल्लीतील भाजपा मुख्यालयात उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यानंतर त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वामुळे मी नेहमीच प्रभावित होत होती. माझ्या चिंतनात राष्ट्राला नेहमीच पहिले स्थान होते. भाजपात प्रवेश करून राष्ट्र आराधनेसाठी मी निघाले असल्याचे अपर्णा यादव यांनी म्हटले.
प्रदेश भाजपाध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह यांनी अपर्णा यादव यांचे भाजपात स्वागत केले. अपर्णा यादव यांच्या प्रवेशाची बर्याच दिवसांपासून चर्चा होती, ती आज प्रत्यक्षात आली, असे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी म्हटले. यादव यांची विचारधारा नेहमीच भाजपाच्या विचारधारेने प्रेरित होती, असे ते म्हणाले.
अपर्णा यादव मुलायमसिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना यादव यांचा मुलगा प्रतीकची पत्नी आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत साधना यादवने आपला मुलगा प्रतीक यादवसाठी तिकीट मागितले होते.
मात्र, नंतर राजकारणात फारशी रुची नसलेल्या प्रतीक यादव यांनी राजकारण सोडले. त्यामुळे अपर्णा यादव यांनी राजकारणात प्रवेश केला. अपर्णा भाजपातर्फे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये अपर्णा यादव यांनी लखनौच्या कॅण्ट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.