किमान तापमान : 25.99° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
24.85°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलमुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्यांचा दबाव,
लखनौ, (३० जानेवारी) – उत्तरप्रदेशमधील एका २३ वर्षीय युवकाने आपल्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याने एका मुस्लिम मुलीशी तीन वर्षांपूर्वी लग्न केले होते. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडून त्याला धर्मांतर करण्यासाठी दबाव आल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
दुष्यंत चौधरी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो शनिवारी आपल्या खोलीत झोपला होता. सकाळी बराच वेळ तो खोलीच्या बाहेर न आल्यामुळे त्याची आई शिक्षादेवी यांनी खोलीत जाऊन बघितले तर, दुष्यंतचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला.
दुष्यंत याने तीन वर्षांपूर्वी मेरठ येथील फरहा नावाच्या मुस्लिम मुलीशी कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय लग्न केले होते. त्यानंतर काही दिवस ते आपापल्या घरी राहिले. दुष्यंत आपल्या पत्नीला घरी घेऊन येणार होता, पण त्याच्या सासरच्या लोकांनी अगोदर धर्मपरिवर्तन करण्याची अट घातली. तू इस्लाम धर्म स्वीकारला तरच मुलगी पाठवू, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तो मागच्या काही दिवसांपासून तणावात होता, अशी माहिती दुष्यंतचा चुलतभाऊ जॉनी चौधरी याने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी फरहासह तिच्या कुटुंबातील चार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.