किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 28.86° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.86° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलन्यायालयात दुसर्या मजल्यावर घडली घटना,
लुधियाना, २३ डिसेंबर – जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीत झालेल्या स्फोटामुळे आज गुरुवारी लुधियाना हादरले. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर, चार जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयीन इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील स्वच्छतागृहात हा स्फोट झाला, असे पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
स्फोट झाला त्यावेळी न्यायालयाचे कामकाज सुरू होते. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी न्यायालयीन इमारतीला वेढा घालून बचाव मोहीम सुरू केली. स्फोटाची भीषणता लक्षात घेता मृत्युमुखी पडणार्यांची संख्या वाढू शकते, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटात पाकिस्तानातील खलिस्तानवादी गटांचा हात असल्याची शक्यता आहे. हा षडयंत्राचा भाग असू शकतो. हा स्फोट घडवून आणण्यासाठी जी व्यक्ती कार्य करीत होती तिचाच या स्फोटात मृत्यू झाला असल्याची शंका तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळाला भेट देणार आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सांगितले.
बॉम्ब ठेवतानाच झाला स्फोट?
स्वच्छतागृहात बॉम्ब ठेवत असतानाच हा स्फोट घडल्याची शंका तपास यंत्रणांना आहे. हा आयईडीचा स्फोट असू शकतो, अशी शक्यता पोलिस अधिकार्यांनी व्यक्त केली. स्फोटात मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या. बॉम्ब ठेवणारी हीच व्यक्ती असावी, अशी शक्यता काही अधिकार्यांनी व्यक्त केली. तपास करण्यासाठी एनएसजीचे पथक घटनास्थळावर रात्री पोहोचले.
वकिलांच्या संपामुळे वर्दळ कमी
स्फोटानंतर परिसरात पोटॅशचा गंध येत होता, अशी माहिती वकिलांनी दिली. न्यायाधीश श्वेता दास यांच्या दुसर्या मजल्यावरील न्यायालयासमोर असलेल्या स्वच्छतागृहात हा स्फोट झाला. श्वेता दास रजेवर असल्याने त्यांच्या न्यायालयात कोणतीही सुनावणी आज नव्हती. न्यायालयातील वकिलांचा संपही सुरू असल्यामुळे परिसरात फारशी वर्दळ नव्हती.
न्यायालय परिसरातील वाहनतळावर उभ्या असलेल्या वाहनांवर पडलेल्या मलब्यावरूनच या स्फोटाची तीव्रता लक्षात येते, असेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले.