किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्ट प्रतिपादन,
वाराणसी, २३ डिसेंबर – गाय ही आमच्यासाठी माता असून, ती आमच्यासाठी पवित्र आहे. ज्यांना गाई-म्हशी थट्टेचा, विनोदाचा विषय वाटत असेल त्यांनी हे लक्षात असू द्यावे की, या देशातील कोट्यवधी लोकांची गुजराण या गोधन आणि पशुधनावरच अवलंबून असते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी केले.
ते वाराणसी येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गाई आणि म्हशींवर विनोद करणार्यांचा समाचार घेताना पंतप्रधान म्हणाले की, याच पशुधनावर देशातील कोट्यवधी लोकांची उपजीविका अवलंबून आहे. गाय आमची माता असून, आमच्यासाठी पवित्र आहे. पण, काहींना आम्हाला असे वाटणे हे देखील पाप वाटते. गायीसंदर्भात बोलणेदेखील काही लोकांना गुन्हा वाटतो. गाय ही काही लोकांसाठी गुन्हा असू शकते, आमच्यासाठी गाय ही पूजनीय आहे. आमचे दुहेरी इंजिनचे सरकार प्रामाणिकपणे आणि संपूर्ण शक्तीनिशी शेतकरी आणि पशुपालकांच्या पाठीशी उभे आहे. आज येथे बनारस काशी संकुलाची करण्यात आलेली पायाभरणी सरकार आणि सहकाराच्या याच भागीदारीचे प्रमाण आहे, असे मोदी यांनी सांगितले.
यावेळी विरोधकांवर हल्ला चढविताना मोदी म्हणाले, जेव्हा मी उत्तरप्रदेशातील ‘डबल इंजिन’च्या दुहेरी शक्तीवर बोलतो तेव्हा काही लोकांना फारच त्रास होतो. हे असेच लोक आहेत, ज्यांनी उत्तरप्रदेशला केवळ जात, धर्म, पंथ याच चष्म्यातून पाहिले. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ यासारखे शब्दही त्यांच्या अभ्यासक्रमात, शब्दकोशात नाहीत. त्यांच्या अभ्यासक्रमात, त्यांच्या शब्दकोशात, त्यांच्या विचारात केवळ माफियावाद, परिवारवाद आणि घरांवर-जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणेच आहे, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना फटकारले.
प्रकल्पांचा शुभारंभ
पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी वाराणसीतील फूड पार्कमध्ये दूध प्रकल्पाची पायाभरणी पार पडली. हा प्रकल्प ३० एकरवर पसरलेला असून, त्याच्या उभारणीसाठी ४७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. येथे दररोज पाच लाख लिटर दुधावर प्रक्रिया होऊ शकेल. पंतप्रधानांच्या हस्ते या दूध प्रकल्पाशी संबंधित असलेल्या १,०७,००० उत्पादकांच्या खात्यावर ३५ कोटी रुपये जमा करण्यात आले. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते २,०९५ कोटी रुपयांच्या २७ प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन समारंभदेखील पार पडले.