किमान तापमान : 27.17° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 42 %
वायू वेग : 4.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, ४ डिसेंबर – पंजाब विधानसभा निवडणुकीत युती करण्यासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि शिरोमणी अकाली दलाचे माजी नेते सुखदेव ढिंडसा यांच्यासोबत भाजपा चर्चा करीत आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी दिली.
कृषी कायदे रद्द करण्यात आले असून, शेतकरी आंदोलनाचा कोणताही परिणाम पंजाब आणि उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता अमित शाह यांनी एका कार्यक्रमात फेटाळली. सहजपणे बहुमत मिळवून भाजपा उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षाच्या सुरुवातीला पंजाब आणि उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे.
शेतकरी आंदोलन संपुष्टात यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करून मोठे मन दाखवले आहे. शेतकर्यांच्या हिताचे नसल्याने तीन कृषी कायदे रद्द करण्यात आले, असा विचार तुम्ही करीत असल्यास तो चुकीचा आहे. हे कायदे रद्द करण्यात आल्याने पंजाबमध्ये कोणताही मुद्दा राहिला आहे, असे मला वाटत नाही. गुणवत्तेच्या आधारेच निवडणूक लढली जाईल, असे अमित शाह यांनी सांगितले.
मतांच्या समीकरणासोबत राजकीय आघाडी जोडणे, ही निडणुकीच्या विश्लेषणाची योग्य पद्धत नाही, असे अमित शाह यांनी भाजपाचे माजी घटकपक्ष अखिलेश यादव यांच्या सपासोबत उत्तरप्रदेशात आघाडी करीत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
…तेव्हा तिसरे रसायनही तयार होते
राजकारण हे एक अजब रसायन आहे. ज्या वेळी दोन पक्ष हातमिळवणी करतात, त्या वेळी त्यांची मते एकत्रित होतात, असे गृहीतक माझ्या मते चुकीचे आहे. ज्या वेळी दोन रसायने एकत्र येतात, त्यावेळी तिसरे रसायनही तयार होते. सपा, कॉंग्रेसने हातमिळवणी केल्याचे आणि त्यानंतर सपा, बसपा व कॉंग्रेसने आघाडी केल्याचे आपण यापूर्वी पाहिले आहे, पण विजय भाजापाचा झाला. नागरिक आता जागरूक झाले आहेत. मतपेटीच्या आधारे करण्यात आलेल्या आघाड्या नागरिकांची मत बदलवू शकत नाही, असे अमित शाह यांनी सांगितले.