किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलयोगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन,
चांदौली, ५ डिसेंबर – उत्तरप्रदेशात सपाची सत्ता असताना रोजगारनिर्मिती व्हायची नाही. मात्र, भाजपाच्या नेतृत्वात येथे सत्ता आल्यानंतर मागील साडेचार वर्षांत ४.५ लाख रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आणि त्यावर कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज रविवारी केले.
यापूर्वी राज्यात केवळ १२ वैद्यकीय महाविद्यालये होती. आम्ही आता ३३ वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करीत आहोत, असे त्यांनी येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण करताना सांगितले. काळ्या तांदळाचे विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल त्यांनी येथील शेतकर्यांचे कौतुक केले. मागील तीन वर्षांत प्रचंड परिश्रम घेत येथील २,४०० शेतकर्यांनी २,१०० हेक्टर जमिनीवर काळ्या तांदळाचे पीक घेतले. हे शेतकरी चांदौलीला निर्यात केंद्र म्हणून विकसित करीत आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
चांदौलीच्या सौंदर्यीकरणाची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली. भारताच्या संस्कृती आणि आध्यात्मिक प्रवासामुळे भारताला मानवतावादी क्षेत्रात नेतृत्व करण्यास मदत झाली आहे. चांदौलीतील बाबा कीनाराामच्या सौंदर्यीकरणाची आम्ही सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.