किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपणजी, ७ डिसेंबर – विधानसभेची निवडणूक उंबरठ्यावर असताना, गोव्यात कॉंगे्रसला आज मंगळवारी आणखी एक झटका बसला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे आमदार रवी नाईक यांनी आज राजीनामा दिला. यामुळे ४० सदस्यीय गोवा विधानसभेतील कॉंगे्रसचे संख्याबळ आता फक्त तीनवर आले आहे. रवी नाईक भाजपात येणार असल्याची माहिती आहे.
ऑक्टोबर महिन्यात माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी कॉंगे्रसचा राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंगे्रसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता रवी नाईक यांच्या राजीनाम्यामुळे हा पक्ष अडचणीत आला आहे.
गोव्यातील पोंडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी असलेले रवी नाईक यांनी विधानसभेचे अध्यक्ष राजेश पाटणेकर यांच्याकडे राजीनामा सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही होती. विशेष म्हणजे, या दोन्ही मुलांनी गेल्या वर्षी भाजपात प्रवेश केला आहे. राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रवी नाईक म्हणाले की, आजपासून माझा कॉंगे्रससोबत कोणताही संबंध नाही. पुढील रणनीती मी लवकरच ठरविणार आहे. दरम्यान, सूत्राच्या मते, येत्या एक-दोन दिवसांतच ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
रवी नाईक यांचा लहान मुलगा रॉय नाईक यांनी सांगितले की, कॉंगे्रस पक्ष जनतेच्या हिताविरोधात वागत असल्याने, आपण भाजपात या, असे आवाहन आम्ही वडिलांना केले आणि त्यांनी लगेच कॉंगे्रसचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंगे्रसने सर्वाधिक १७ जागा जिंकल्या होत्या. तथापि, १३ जागा जिंकणार्या भाजपाने काही प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते.