किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.35° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.27°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलमुख्यमंत्री आदित्यनाथ यांची घोषणा,
आग्रा, ११ डिसेंबर – तामिळनाडूतील कुन्नूर येथील हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांच्या कुटुंबीयांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पृथ्वी सिंह हे आग्रा येथील रहिवासी होते. योगी आदित्यनाथ हे पृथ्वी सिंह चौहान यांच्या घरी गेले आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. सोबतच आदित्यनाथ यांनी विंग कमांडरच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि एखाद्या संस्थेला त्यांचे नाव देण्याची घोषणा केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या देवरिया जिल्ह्यातील रहिवासी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विंग कमांडर पृथ्वी सिंह ४२ वर्षांचे होते आणि ते कोईम्बतूरमधील भारतीय वायुसेना स्टेशनवर तैनात होते. त्यांचा जन्म आग्रा येथे झाला. पृथ्वी सिंह यांचे संपूर्ण कुटुंब आग्रा येथे राहते. पृथ्वी सिंह हे एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टरचे पायलट होते.
लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
पृथ्वी सिंह चौहान यांचे पार्थिव आज शनिवारी आग्रा येथे पोहोचले. तिथे संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आला. चिंचोळ्या गल्लीत त्यांचे घर असल्यामुळे आणि गल्लीतील रस्ता खराब असल्यामुळे प्रशासनाने त्याचे दखल घेत, शुक्रवारी रात्री अडीच तास परिश्रम घेऊन रस्त्याचे डांबरीकरण केले. १२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रस्ता चांगला करण्यात आला, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
मनाला चटका देणारा प्रसंग
विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबीय भावुक झाले होते. चौहान यांच्या शवपेटीवर तिरंगा होता आणि त्यांची कॅप त्यावर ठेवली होती. यावेळी मनाला चटका देणारा प्रसंग घडला. चौहान यांच्या सात वर्षांच्या मुलाने हळूच ती कॅप उचलली, त्यावर पडलेली फुले साफ केली अन् ती कॅप स्वत: परिधान करून त्याने वडिलांना अखेरचा सॅल्यूट केला.