किमान तापमान : 24.47° से.
कमाल तापमान : 25.42° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.03 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.47° से.
23.99°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलसीडीएस रावत यांच्या मृत्युनंतरच्या प्रतिक्रियांमुळे संताप,
थिरुअनंतपूरम्, ११ डिसेंबर – मल्याळम् दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम धर्म सोडला असून, लवकरच ते हिंदू धर्म स्वीकारणार आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्युनंतर काही इस्लामवाद्यांकडून आनंद व्यक्त केल्याच्या निषेधार्थ अली अकबर यांनी इस्लाम धर्माचा त्याग केला. जनरल रावत यांच्या अपघाती निधनाच्या पोस्ट आणि प्रतिक्रियांच्या खाली अनेक इस्लामवाद्यांनी स्मायली इमोजी वापरल्याने ते संतप्त झाले.
दिग्दर्शक अली अकबर यांनी यापूर्वी सीडीएस रावत यांच्या मृत्युबाबत आक्षेपार्ह मत व्यक्त करणार्या इस्लामवाद्यांवर टीका करणारा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. व्हिडीओवर आक्षेपार्ह कॉमेंट केल्यामुळे अकबर यांचे खाते एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी दुसरे खाते उघडून त्यावर इस्लाम सोडत असल्याचे जाहीर केले.
मोठ्या इस्लामिक नेत्यांनीही शूर लष्करी अधिकार्यांचा अपमान करणार्या देशद्रोही अशा कृतींना विरोध केला नाही, हे आपण स्वीकारू शकत नाही. आपला धर्मावरील विश्वास उडाला आहे. त्यांनी फेसबुकवर यासंबंधित व्हिडीओ पोस्ट केला आहे. आजपासून मी मुस्लिम नाही. मी भारतीय आहे. भारताविरुद्ध इमोजी पोस्ट करणार्या लोकांना हेच माझे उत्तर आहे, असे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
अकबर यांना वाढता पाठिंबा
या पोस्टवर फेसबुकवरील मुस्लिम समाजाकडून तीव्र टीका झाली आणि काहींनी अपमानास्पद भाषाही वापरली. दरम्यान, अनेक वापरकर्त्यांनी अकबर यांना पाठिंबा दिला आणि त्यांना शिवीगाळ करणार्यांना फटकारले.
ही पोस्ट नंतर फेसबुकवरून काढून टाकण्यात आली असली तरी, ती व्हॉट्सऍपवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. नंतर, अकबर यांनी आणखी एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी म्हटले, सीडीएसच्या मृत्यूवर हसणार्यांची ओळख पटवून शिक्षा केली पाहिजे.
राजस्थानातील जावेदला अटक
जयपूर ः सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्युबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या जावेद खानला अटक करण्यात आली. तो जयपूर येथील नझरबाग मार्गावर राहतो. त्याचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली होती. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायदंडाधिकार्यांनी दिला आहे, अशी माहिती पोलिस अधिकार्यांनी दिली.