किमान तापमान : 24.31° से.
कमाल तापमान : 24.96° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 3.61 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.31° से.
23.99°से. - 28.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलराहुल गांधींचे जयपूरमध्ये आवाहन,
जयपूर, १२ डिसेंबर – देशात २०१४ पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे, हिंदूंची नाही. या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढा आणि देशात पुन्हा हिंदूंची सत्ता आणा, असे आवाहन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज रविवारी केले.
जयपूर येथे कॉंग्रेसने महारॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपावर हल्ला चढवला. या रॅलीत बर्याच कालावधीनंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या.
हिंदुत्ववादी सत्तेचे भुकेले आहेत. २०१४ मध्ये हिंदुत्वावादी सत्तेत आले. मात्र, हिंदू आजही सत्तेपासून दूर आहेत. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूंना सत्तेत आणायचे आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
हिंदू सत्यासाठी मरत असतो. सत्य हाच त्याचा मार्ग आहे. तो जीवनभर सत्याच्या शोधात असतो. महात्मा गांधींचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधात गेले. हिंदुत्ववादी गोडसेने त्यांच्या छातीत तीन गोळ्या घातल्या. हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही घेणे देणे नाही. सत्याचा शोध घेत असताना हिंदू कधीच कुणापुढे झुकत नाही.
मात्र, हिंदुत्ववादी हा द्वेषाने पछाडलेला असतो. कारण, त्याच्या मनात भीती असते. आपल्याला घाबरवले जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला घाबरत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे. त्यांना सत्य नको आहे. त्यांचा मार्ग सत्याग्रहाचा नाही. तर सत्ताग्रहणाचा आहे. हिंदू नेहमीच भयाशी संघर्ष करीत असतो, असेही त्यांनी सांगितले.
गांधी आणि गोडसेंमधील फरक!
यावेळी राहुल यांनी गांधी आणि गोडसेंमधील फरकही समजावून सांगितला. हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन शब्दांचा आत्मा एकसारखा असूच शकत नाही. मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. या देशात या दोन शब्दांचा संघर्ष आहे. एक शब्द आहे हिंदू आणि दुसरा आहे हिंदुत्ववादी आहे. हे दोन्ही शब्द एक नाही. महात्मा गांधी हिंदू होते, तर गोडसे हिंदुत्ववादी होता, असेही त्यांनी सांगितले.