किमान तापमान : 24.96° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 3.61 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.95°से. - 28.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.23°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’वर गुन्हा दाखल,
बडोदा, १४ डिसेंबर – गुजरातमध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटी या ख्रिश्चन संस्थेवर धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे. ही संस्था मदर तेरेसा यांनी स्थापन केली होती. या धर्मांतरप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेतर्फे चालवल्या जाणार्या बालसुधार गृहात राहणार्या मुलींना ख्रिश्चन बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बडोदा शहरातील या बालगृहाविरोधात गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा २००३ अन्वये हिंदू धार्मिक भावना दुखावल्याचा आणि अल्पवयीन मुलींना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, संस्थेने हे आरोप फेटाळून लावले आहेत. जिल्हा सामाजिक सुरक्षा अधिकारी मयंक त्रिवेदी यांनी याबाबतची तक्रार केली होती. त्यांनी अलिकडेच या बालसुधार गृहाला भेट दिली होती.
बालगृहातील मुलींना ख्रिश्चन धर्माकडे नेण्याच्या उद्देशाने ख्रिश्चन धार्मिक ग्रंथ वाचण्यास आणि ख्रिश्चन प्रार्थनांमध्ये भाग घेण्याची बळजबरी करण्यात आली होती, असे आपल्याला या भेटीत आढळून आल्याचे त्रिवेदी यांनी म्हटले आहे. ही संस्था १० फेब्रुवारी ते ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून काम करीत आली आहे.
मुलींच्या गळ्यात क्रॉस बांधून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले जात आहे. मुली वापरत असलेल्या स्टोअररूमच्या टेबलावर बायबल ठेवून त्यांना ते वाचायला भाग पाडण्याचे प्रयत्न होत आले, असे त्रिवेदी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
व्यवस्थापनाचा नकार
मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या व्यवस्थापनाने जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप नाकारला आहे. चॅरिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही कोणत्याही धार्मिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी नाही. आमच्या बालगृहात २४ मुली आहेत. या मुली आमच्यासोबत राहतात आणि त्या अभ्यास करतात. आम्ही कोणाचेही धर्मांतर केलेले नाही किंवा कोणाला ख्रिश्चन धर्मात लग्न करण्यास भाग पाडले नाही.