किमान तापमान : 26.93° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 32 %
वायू वेग : 2.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
25.02°से. - 28.99°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.23°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलविजयकुमार यांची माहिती,
श्रीनगर, १४ डिसेंबर – जम्मू-काश्मीर सशस्त्र पोलिस दलाच्या बसवर झालेला दहशतवादी हल्ला सुनियोजित होता. नियमित कर्तव्य पार पाडून तळावर परतत असताना झालेल्या या हल्ल्यात पोलिसांचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत, अशी माहिती काश्मीरचे पोलिस महासंचालक विजयकुमार यांनी आज मंगळवारी दिली.
२५ पोलिस कर्मचार्यांना घेऊन ही बस नेहमीप्रमाणे तळावर परतत होती. या वेळी जैश-ए-मोहदम्मदच्या तीन अतिरेक्यांनी बसवर गोळीबार केला. हा एक सुनियोजित हल्ला होता. जवानांची ड्युटी संपल्यावर त्यांना घेऊन बस नियमितपणे तळावर परतते, याची पाहणी निश्चितपणे अतिरेक्यांनी केली असावी, असे त्यांनी सांगितले.
अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सहायक पोलिस उपनिरीक्षक गुलाम हसन, कॉन्स्टेबल शफीक अली आणि रमीझ बावा हे हुतात्मा झाले असून, जखमी झालेल्या ११ पोलिस कर्मचार्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या हल्ल्यात एक स्थानिक तर, दोन विदेशातील दहशतवाद्यांचा सहभाग होता. त्यांच्याबाबत आम्हाला मोठ्या प्रमाणात माहिती मिळाली आहे. लवकरच अतिरेक्यांच्या या गटाला निष्प्रभ करू, असे विजयकुमार यांनी सांगितले.
झेवन येथील पोलिस तळाकडे जाणार्या रस्त्यावर काही ठिकाणी पथदिवे नाहीत. हल्ला झाला त्यावेळी पोलिसांचे रस्ता सुरक्षित करणारे पथक दिवसभरासाठी रवाना करण्यात आले होते. रस्त्यावर दिवे बसवण्यासह आम्ही खबरदारीच्या सर्व उपाययोजना करीत आहोत, असे विजयकुमार यांनी सांगितले.
प्रत्युत्तरात एक अतिरेकी जखमी
अडचणीच्या स्थितीत असतानाही पोलिसांनी अतिरेक्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत, शस्त्रास्त्रे लुटून नेण्याचा डाव उधळून लावला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक अतिरेकी जखमी झाला असून, काही अंतरापर्यंत रक्ताचे डाग दिसून आले आहेत. ते कुठे पसार झाले याची माहिती आम्हाला आहे. आम्ही त्यावर काम करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.
अतिरेकी हल्ल्यातील जखमी कॉन्स्टेबलचा मृत्यू
श्रीनगरजवळ जम्मू-काश्मीर पोलिसांच्या बसवर सोमवारी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलचा आज मंगळवारी मृत्यू झाला. यामुळे या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांची संख्या तीन झाली आहे. जम्मू-काश्मीर सशस्त्र पोलिस दलाच्या नवव्या बटालियनचे कॉन्स्टेबल रमीझ अहमद यांचा आज लष्कराच्या रुग्णालयात मृत्यू झाला, असे अधिकार्यांनी सांगितले. जैश-ए-मोहम्मदची उपसंघटना काश्मीर टायगर्स नावाच्या संघटनेने श्रीनगरचा बाह्यभाग असलेल्या झेवन येथे सोमवारी पोलिसांच्या बसवर गोळीबार केला होता.
या हल्ल्यात सोमवारी सहायक पोलिस उपनिरीक्षक गुलाम हसन आणि कॉन्स्टेबल शफीक अली हे हुतात्मा झाले तर, रमीझ यांच्यासह १२ जवान जखमी झाले होते. जैश-ए-मोहम्मदने संसदेवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याला सोमवारी २० वर्षे पूर्ण झाली. त्या पृष्ठभूमीवर हा हल्ला करण्यात आला.