किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलअयोध्या, २ डिसेंबर – कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आणि लोकप्रिय स्थळांपैकी एक असलेल्या अयोध्येवर अतिरेकी हल्ल्याचा कट रचण्यात आला आहे. गुप्तहेर यंत्रणेने दिलेल्या या माहितीनंतर अयोध्येत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.
अयोध्येत शुक्रवारपासून श्रीराम विवाहाचा उत्सव सुरू होत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार, हे गृहितच आहे. शिवाय येत्या तीन दिवसांनी अयोध्येतील वादग्रस्त ढाचा पाडल्याच्या घटनेची तारीख अर्थात् सहा डिसेंबर येत असल्यानेही या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या पृष्ठभूमीवर अयोध्येत गुरुवारी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी अयोध्येतील सुरक्षा व्यवस्थेला आढावा घेत संपूर्ण जिल्ह्याची स्वत: जातीने पाहणी केली.
डायल ११२ या क्रमांकावर अज्ञात युवकाने अयोध्येला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. फोनवर धमकी देणारा युवक अहमदाबाद येथील असल्याचे समजते. या धमकीनंतर अयोध्येतील सर्व प्रवेशद्वारांवर तसेच धर्मशाळांमध्येही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. एटीएसच्या चमूनेही स्थितीचा आढावा घेत सर्वत्र चोख बंदोबस्त केला आहे. अगदी पादचारी नागरिकांच्याही सुरक्षेची काळजी घेण्याबाबत पोलिसांनी आश्वस्त केले आहे.
त्यातही उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजू लागल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेला हादरा देण्यासाठी कट रचला जात असल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे.