किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलचंदीगड, ७ नोव्हेंबर – आपल्या राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे चुकीची माहिती पसरवित आहेत. शिवाय राज्य सरकार व महाधिवक्त्यांच्या कामात अडथळे आणत आहेत, असा आरोप पंजाबचे महाधिवक्ता एपीएस देओल यांनी केला.
सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी पंजाब कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता व आता तो त्यांनी मागे घेतला आहे, मात्र राज्य सरकारने पोलिस महासंचालक साहोटा व महाधिवक्ता देओल यांच्या जागी अन्य व्यक्तींची नियुक्ती केली, तरच आपण प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारू, असे त्यांनी शुक्रवारी म्हटले होते. त्यावर देओल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देओल यांनी २०१५ मधील धर्मग्रंथ अवमान व गोळीबार प्रकरणातील दोन पोलिस अधिकार्यांचे वकीलपत्र घेतले होते, असा आरोप सिद्धू यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता काही हितसंबंधी लोक कॉंग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील घटनात्मक पद असलेल्या महाधिवक्त्यांच्या कार्यालयास बदनाम करण्यामागे त्या लोकांचा राजकीय स्वार्थ आहे. अंमली पदार्थांचे प्रकरण असो की धार्मिक अवमानाचे, त्यात योग्य तो न्याय करण्याचा प्रयत्न सरकार करीत असून त्यात खीळ घालण्याचे काम कॉंग्रेसचा हा नेता सतत आरोप करून करीत आहे, असे देओल यांनी म्हटले आहे.
देओल यांनी सिद्धू यांच्यावर उघड टीका केल्याने आता सिद्धू व पंजाबमधील चरणजितसिंग चन्नी सरकारमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री चन्नी हे सिद्धू यांचा दबाव जुमानण्यास तयार नसल्याचे मानले जाते.
राज्यपालांनी हस्तक्षेप करावा
पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत वादांमुळे राज्यातील शासकीय यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडली आहे, त्यामुळे आता यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, असे भाजपाचे नेते तरुण चूघ यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या वर्तनामुळे राज्याच्या घटनात्मक चौकटीला धक्का बसत असून यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, असे त्यांनी म्हटले आहे. धार्मिक अवमान प्रकरणात कॉंग्रेस दोषींना शिक्षा करण्याऐवजी केवळ राजकारण करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.