किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलछत्तीसगडमधील घटना,
सुकमा, ८ नोव्हेंबर – छत्तीसगडमधून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सुकमा येथे एका केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने आपल्याच सहकार्यांवर अचानक गोळीबार केला. या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला तर, तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. बस्तरचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. गोळीबार करणारा जवान भावनिक तणावात होता, अशी सीआरपीफच्या अधिकार्यांनी दिली.
सुकमा येथील मराईहगुडा स्टेशनअंतर्गत येणार्या लिंगमपल्ली सीआरपीएफ शिबिरात हा गोळीबार झाला. सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनचा एक जवान रात्रपाळीच्या ड्युटीवर तैनात होता. त्या जवानाने अचानक मध्यरात्री शिबिरात गोळीबार केला. या गोळीबारानंतर एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवानाने शिबिरात गोळीबार का केला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सीआरपीएफकडून या घटनेचा तपास केला जात आहे. पी. सुंदरराज यांनी सांगितले की, पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास वाद झाल्यानंतर सीआरपीएफच्या जवानाने आपल्या एके-४७ रायफलने अन्य सहकार्यांवर गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच, अन्य जवान आणि अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. आरोपी जवानाला पकडण्यात आले आहे. पोलिस आणि सीआरपीएफ आरोपी जवानाची चौकशी करीत आहेत.