किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलचंदीगड, ६ नोव्हेंबर – कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेताच नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. सत्तेत येऊन चन्नी यांना ५० दिवसांचा कालावधी लोटला आहे. या काळात त्यांनी नेमके काय केले. एसटीएफचा ड्रग्जसंदर्भातील अहवाल सार्वजनिक करण्यात उशीर का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सिद्धू यांनी २८ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, केंद्रीय नेत्यांच्या दबावापुढे नमते घेत त्यांनी शुक्रवारी राजीनामा मागे घेतला. आज सकाळी त्यांनी गुरुद्वाराचे दर्शन घेतल्यानंतर चन्नी सरकारवर हल्ला चढविला. मागील ५० दिवसांत ड्रग्ज प्रकरणातील एसटीएफचा अहवाल अद्याप का उघड केला नाही, गुरू ग्रंथ साहिब अपमानाच्या प्रकरणी काय केले, असा सवाल उपस्थित करत सिद्धूंनी आपल्याच पक्षाच्या सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
चन्नी सरकारने न्याय मिळवून देण्यात आणि एसटीएफचा अहवाल सार्वजनिक करण्यात विलंब का केला, अहवाल सार्वजनिक करण्याची हिंमत नसेल, तर त्यांनी तो मला किंवा पक्षाला द्यावा, असे त्यांनी सांगितले.
कॉंगे्रस कार्यसमितीच्या बैठकीतही या अहवालावर चर्चा झाली आहे. तो सार्वजनिक व्हावा, असे कॉंगे्रसचेही मत आहे. मात्र, कोणताही पाठपुरावा झालेला नाही. पोलिस महासंचालकपदाचा मुद्दा महिनाभर आधीच सोडवायला हवा होता. मात्र, त्यावरही तोडगा निघालेला नाही. फक्त ९० दिवसांसाठी सत्तेवर आलेल्या या चन्नी सरकारचे ५० दिवस उलटले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही मुद्याला हात घातला नाही, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.