किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलपंतप्रधान मोदी यांनी केले शंकराचार्य यांच्या मूर्तीचे अनावरण,
डेहराडून, ५ नोव्हेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी उत्तराखंडमधील केदारनाथ धामला भेट देऊन सुमारे ४०० कोटी रुपयांच्या विकास योजनांचे लोकार्पण केले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पाचवा केदारनाथ दौरा आहे. सकाळी मोदी यांनी बाबा भोलेनाथांची पूजा केली. त्यानंतर त्यांनी आदि गुरू शंकराचार्य यांच्या समाधीचे अनावरण केले.
२०१३ मध्ये आलेल्या महाविनाशी प्रलयात शंकराचार्य यांच्या समाधीचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी मोदींनी केदारनाथमधील विकासकामांचा आढावा घेतला. ‘जय बाबा केदारनाथ’ अशी घोषणा देत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनाची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाप्रलयामुळे मोठं नुकसान झालं होतं. हे खूप प्रचंड मोठे नुकसान होते.
येथे येणार्या भाविकांना केदारनाथ धाम पुन्हा पहिल्यासारखे होईल का, याविषयी शंका होती. हे धाम पहिल्यापेक्षाही चांगले होईल, यावर माझा विश्वास होता. रामचरित मानसमध्ये म्हटले आहे की, काही अनुभव इतके वेगळे असतात की, ते शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. असाच अनुभव केदारनाथमध्ये येतो, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी यावेळी केदारनाथमध्ये १३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद२घाटन केले आणि ४०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण केले. यावेळी माजी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत आणि विद्यमान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी उपस्थित होते. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराची ८ क्विंटल फुलांनी सजावट करण्यात आली होती.
मोदींचे केदारनाथशी विशेष संबंध पंतप्रधान मोदी यांचे केदारनाथशी विशेष संबंध आहेत. मागील २० वषारपासून ते येथे येत असतात. २०१३ मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर पंतप्रधानांनी केदारनाथमध्ये पुन्हा विकासकार्य सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, परवानगी मिळाली नव्हती. पंतप्रधान झाल्यावर मोदींनी सलग केदारनाथचे दौरे केले आणि केदारपुरी वसवण्याचा संकल्प घेतला होता. या अनुषंगाने काम सुरू आहे. नव्या केदारपुरी निर्माणाचे काम ९० टक्क्यांपयरत पूर्ण झाले आहे.
मोदींनी सांगितला ‘शंकर’ शब्दाचा अर्थ यावेळी मोदींनी शंकर या शब्दाचा अर्थ सांगितला. संस्कृतमध्ये ‘शंकर’ शब्दाचा अर्थ ‘शं करोति स… शंकर…’ असा होतो. म्हणजे जे कल्याण करीत आहेत, तेच शंकर आहेत. या व्याख्येला आदि शंकराचार्याने प्रत्यक्षात प्रमाणित केले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन जितके असाधारण होते, तितकेच ते जनतेसाठी समर्पित होते, असे त्यांनी सांगितले.