किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलचंदीगड, २ नोव्हेंबर – पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देत आज मंगळवारी पंजाब लोक कॉंग्रेस या नवीन पक्षाची घोषणा केली. पक्षाची औपचारिक सुरुवात नंतर केली जाईल. निवडणूक आयोगाला या नावावर आक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेससोबत पडद्याआड वाटाघाटी सुरू असल्याचा दावा फेटाळत कॉंग्रेससोबत पुन्हा जुळण्याची वेळ गेली, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांसोबत चर्चा करताना स्पष्ट केले होते. त्यानंतर आज नवीन पक्षाच्या नावाची घोषणा अमरिंदरसिंग यांनी केली.
राज्य सरकारमधून हटवण्यासाठी गांधी कुटुंबाने कट रचला, असा घणाघात त्यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या सात पानांच्या राजीनामा पत्रात केला आहे. पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून मिळवलेल्या यशांची यादी त्यांनी या पत्रात दिली.
५२ वर्षांचे सार्वजनिक जीवन माहीत असताना सोनिया गांधी यांना आपले चारित्र्य समजू शकले नाही, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. वर्षानुवर्षे माझी सत्ता आहे आणि आता अडगळीत टाकले पाहिजे, असा विचार तुम्ही केला. मात्र, मी थकलेलो नाही किंवा सेवानिवृत्त झालेलो नाही. माझ्या लाडक्या पंजाबला देण्यासारखे आणि त्याच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
नवज्योतसिंग सिद्धूंवर संताप
नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर पंजाब कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त करताना ते म्हणाले, माझ्या आक्षेपानंतर आणि पंजाबमधील जवळपास सर्व खासदारांनी एकमताने दिलेल्या सल्ल्यानंतरही या पदावर तुम्ही पाकिस्तानचा निकटवर्तीय सिद्धूंची नियुक्ती केली. याच सिद्धूंनी पाकिस्तानी लष्करप्रमुख बाजवा आणि इम्रान खानची गळाभेट घेतली होती. सीमापार अतिरेकी पाठवून भारतीयांचा बळी घेण्यामागे हेच खान आणि बाजवा जबाबदार आहेत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.