किमान तापमान : 27.05° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
24.55°से. - 27.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुख्यमंत्री बोम्मई यांची घोषणा,
बंगळुरू, २ नोव्हेंबर – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून कित्तूर कर्नाटक प्रदेश ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले की, मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून कित्तूर कर्नाटक प्रदेश केले जाईल. वारंवार सीमा वाद निर्माण होत असताना जुने नाव ठेवण्यात अर्थ नाही, त्यामुळे या भागाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त असलेल्या कर्नाटक राज्योत्सवादरम्यान बोम्मई यांनी ही घोषणा केली.
हैदराबाद-कर्नाटक क्षेत्राचे नाव आम्ही नुकतेच बदलून कल्याण कर्नाटक केले आहे. आता येत्या काही दिवसांत आम्ही मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. बेळगाव जिल्हा आणि कर्नाटकातील काही सीमावर्ती भाग महाराष्ट्रात विलीन करण्याच्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी वारंवार केलेल्या दाव्यांवर मुख्यमंत्री बोलत होते. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही बोम्मई म्हणाले.
आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांच्या गटाला कित्तूर कर्नाटक प्रदेश असे नाव देण्यामागील कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकच्या एकीकरणानंतर सीमावादाला सुरुवात झाली. त्यावर तोडगाही काढला. तरीही वाद सुरूच असल्याचे ऐकायला येते. इतक्या गाष्टी घडत असताना त्याला मुंबई-कर्नाटक म्हणण्यात काही अर्थ आहे का, राज्य पुनर्रचना कायदा लागू झाला, तेव्हा या क्षेत्रात बदल व्हायला हवा होता. केवळ नाव बदलून त्या प्रदेशातील लोकांचे जीवनमान आणि विकास सुधारत नाही, प्रादेशिक असमतोल आणि असमानताही दूर करून सर्व प्रदेशांचा एकत्रित विकास झाला पाहिजे. राज्यातील कोणतेही क्षेत्र अविकसित न ठेवण्याचा संकल्प करून प्रादेशिक विषमता संपवण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.