किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 27.37° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.37° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलविशेष न्यायालयाचा निकाल, मोदींच्या सभेत घडवले होते स्फोट,
पाटणा, १ नोव्हेंबर – नरेंद्र मोदी यांच्या २०१३ मध्ये झालेल्या सभेत साखळी बॉम्बस्फोट घडविण्याच्या आरोपात दोषी ठरवलेल्या चार अतिरेक्यांना येथील विशेष न्यायालयाने आज सोमवारी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या व्यतिरिक्त दोन दोषींना जन्मठेप, तर दोघांना सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
यातील दोषी असलेल्या पाच अतिरेक्यांना दुसर्या एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यात उमर सिद्दिकी, अजहरुद्दिन, अहमद हुसैन, फकरुद्दिन, फिरोज आलम उर्फ पप्पू, नुमान अन्सारी, इफ्तिखार आलम, हैदर अली उर्फ अब्दुल्ला, मोहम्मद मोजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज अन्सारी उर्फ आलमचा समावेश आहे. बोधगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात यातील इम्तियाज, उमेर, अजहर, मोजिबुल्ला आणि हैदरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
…तरीही मोदींनी घेतली होती सभा
२७ ऑक्टोबर २०१३ रोजी पाटणा येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती. मात्र, सभेपूर्वीच झालेल्या स्फोटांनी पाटणा हादरले. नरेंद्र मोदी सभास्थानी पोहोचण्यापूर्वीच गांधी मैदानासह पाटण्यात पाठोपाठ आठ स्फोट झाले. या स्फोटांपूर्वी पाटणा जंक्शनच्या स्वच्छतागृहातही स्फोट झाला होता. साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतरही नरेंद्र मोदी यांनी येथे सभा घेतली होती. साखळी बॉम्बस्फोटांत सहा जणांचा मृत्यू झाला, तर ८३ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. पाटण्यातील आठपैकी दोन स्फोट सभा संपल्यानंतर सुरक्षा तपासणी केली जात असताना घडवण्यात आले.
स्फोटांना फटाके समजून आवाहन
गांधी मैदानावरील एक स्फोट पत्रकारांच्या गॅलरीमागे झाला. नागरिकांनी फटाके फोडू नयेत, असे आवाहन सुशील मोदी यांनी केले होते. नरेंद्र मोदी येणार असल्याच्या आनंदात भाजपा कार्यकर्ते फटाके फोडत असावे, असे त्यावेळी सुशील मोदींना वाटले होते. मात्र, हा अतिरेकी हल्ला असल्याचे त्यांना नंतर कळले.