किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलचंदीगड, २५ डिसेंबर – लुधियाना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात कुख्यात गुंड हरविंदरसिंग उर्फ रिंदासिंगचे नाव समोर आले. या हल्ल्याचा सूत्रधार असलेला रिंदा पाकिस्तानमध्ये असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि पोलिसांनी स्फोटात ठार झालेल्या गगनदीपसिंगच्या घराची झडती घेतली.
पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गगनदीपच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. गगनदीप हा माजी हेड कॉन्स्टेबल होता, त्याला २०१९ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. गगनदीपच्या एका मैत्रिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची मैत्रीण कॉन्स्टेबल असून, ती सध्या पोलिस अधीक्षक कार्यालयात तैनात आहे. मादकपदार्थांच्या प्रकरणात त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता.
खलिस्तानवादी, मादकपदार्थ तस्करांची हातमिळवणी
खलिस्तानवादी आणि मादकपदार्थांच्या तस्करांनी हातमिळवणी केली असल्याचे तपासात समोर आले, अशी माहिती पोलिस महासंचालक सिद्धार्थ चटोपाध्याय यांनी दिली. दहशतवाद आणि मादकपदार्थांच्या तस्करीचे आव्हान पंजाबसमोर आहे. या तस्करांची संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद राज्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, असे चटोपाध्याय यांनी स्पष्ट केले.
रिंदाला तीन आंतरराष्ट्रीय कॉल
लुधियानामधील २३ मोबाईल टॉवरच्या माहितीचा शोध घेण्यात आला आणि तिथून रिंदाला तीन आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात आले. त्याचे साथीदार उत्तरप्रदेश, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तेथे पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.
हरविंदरसिंगने केला स्फोट
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना बब्बर खालसाने लुधियाना न्यायालयात स्फोट घडवला आहे. स्थानिक गुन्हेगार हरविंदरसिंग ऊर्फ रिंदाच्या माध्यमातून हे कृत्य केल्याचे संघटनेचा प्रमुख वाधवासिंगने सांगितले. रिंदा काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात पळून गेला होता. पंजाबमधील या स्फोटासाठी त्याने काही गुंड सक्रिय केल्याचा आरोप आहे.
इंटरनेट डोंगलच्या सिमवरून खुलासा
गगनदीप दोन वर्षे तुरुंगात असताना दहशतवादी रिंदाच्या संपर्कात होता. त्याच्या सांगण्यावरून चार महिन्यांपूर्वी गगनदीप न्यायालयात बॉम्ब ठेवण्यासाठी जामिनावर बाहेर आला होता. स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या अर्ध्या जळालेल्या इंटरनेट डोंगलच्या सिमचा मागोवा घेतला असता, या डोंगलवरून न्यायालयात १३ इंटरनेट कॉल करण्यात आले होते, त्यापैकी ४ बॉम्ब सक्रिय करण्यासाठी होते. यादरम्यान स्फोट झाला आणि त्यात गगनदीप ठार झाला.