किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलताज्या सर्वेक्षणातील निष्कर्ष,
नवी दिल्ली, २५ डिसेंबर – उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचेच सरकार येणार असल्याचे एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. समाजवादी पक्ष राज्यात दुसर्या क्रमांकावर राहण्याची शक्यता असून, बसपा आणि कॉंगे्रसला राज्यातील जनता पुन्हा नाकारण्याची शक्यता या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.
एबीपी आणि सी-व्होटर्सने सर्वेक्षण केले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सपाच्या मतांची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. तिथेच बसपा आणि कॉंगे्रसच्या पदरी निराशा पडण्याचा अंदाज आहे.
राज्यातील ४८ टक्के लोकांनी भाजपाच पुन्हा एकदा सत्तेत येईल, असे मत व्यक्त केले. तर ३१ टक्के लोकांनी सपाला पसंती दिली आहे. मायावती पुन्हा सत्तेत येतील, असे सात टक्के लोकांना वाटते. सहा टक्के लोकांनी कॉंग्रेसला पसंती दिली, तर दोन टक्के लोकांनी त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवली आहे.
१६ ते २३ डिसेंबर या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले. भाजपाला मागील निवडणुकीच्या तुलनेत थोड्या कमी जागा मिळण्याची शक्यता असली, तरी हा पक्ष स्पष्ट बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे भाकित नोंदविण्यात आले आहे. एकीकडे अखिलेश यादव सत्तेचा दावा करीत असले, तरी त्यांच्या हातात सत्ता जाणार नाही, असा विश्वास असलेला वर्ग मोठा आहे. त्यांच्या समाजवादी परिवर्तन यात्रेलाही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे यातून दिसून आले आहे. केंद्रातील भाजपा सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याने हा मुद्दा निवडणुकीत फारसा प्रभावी ठरणार नसल्याचे दिसत आहे.