किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 27.53° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.53° से.
23.94°से. - 28°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलअलाहाबाद उच्च न्यायालयाची पंतप्रधानांना विचारणा,
अलाहाबाद, २४ डिसेंबर – देशात ओमिक्रॉन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणूक एक ते दोन महिने पुढे ढकलणे शक्य आहे का, अशी विचारणा अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. निवडणूक निर्धारित वेळेतच घ्यायची झाल्यास राजकीय पक्षांच्या प्रचारसभा आणि रॅलींवर बंदी घातली जावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.
न्या. शेखरकुमार यादव यांच्या एकलपीठात काही जामीन अर्जांवर सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयातील गर्दी पाहून न्यायालयाने पंतप्रधान मोदींना उपरोक्त आवाहन केले आहे.
येथे न्यायालयात जर इतकी गर्दी होत असेल, तर विचार करा, निवडणुकीच्या काळात प्रचारसभांना किती गर्दी होईल. सध्या कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट देशात वेगाने पसरत आहे. अशा स्थितीत निवडणुका घेणे म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढविण्यासारखे होईल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. राज्यातील निवडणूक रॅली आणि सभा रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलावी. राजकीय पक्षांना टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रचार करण्यास सांगावे. जीव आहे तर सर्वच काही आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी निवडणुका पुढे ढकलण्यावर विचार करावा, असेही न्यायालयाने नमूद केले.
आयोगानेच निर्णय घ्यावा : अनुराग ठाकूर
अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्याबाबत सूचना केली असली, तरी यावरील अंतिम निर्णय निवडणूक आयोगालाच घ्यावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज व्यक्त केली.
निवडणूक आयोग झाले सक्रिय
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात काय, यावर निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोग पुढील आठवड्यात दोन्ही राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी ही माहिती दिली.