|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.69° से.

कमाल तापमान : 31.94° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 35 %

वायू वेग : 3.08 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

31.94° से.

हवामानाचा अंदाज

23.94°से. - 31.94°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.38°से. - 28.63°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.28°से. - 29.45°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.43°से. - 28.72°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.15°से. - 28.01°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.72°से. - 27.96°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » पंजाब-हरयाणा, राज्य » अमृतसरमध्ये सापडला दोन किलो आरडीएक्सचा टिफिन बॉम्ब

अमृतसरमध्ये सापडला दोन किलो आरडीएक्सचा टिफिन बॉम्ब

चंदीगढ, ९ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनापूर्वी पंजाब पोलिसांना अमृतसरमधील एका गावात दोन किलो आरडीएक्स असलेला टिफिन बॉम्ब आढळला. पाकिस्तानातून आलेल्या ड्रोनने हा बॉम्ब अमृतसरमध्ये टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांना ही स्फोटके वेळीच आढळल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
टिफिन बॉम्ब असलेल्या पिशवीत आणखी काही स्फोटके सापडली आहेत, अशी माहिती पंजाबचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिली. अमृतसरच्या ग्रामीण भागात रविवारी काही स्फोटके जप्त करण्यात आली. आम्हाला काही ग्रेनेड्‌स आणि काडतुसे सापडली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आयईडी असलेला टिफिन बॉक्स आम्हाला आढळला, असे गुप्ता यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
परिसरात ड्रोनच्या हालचाली दिसल्याची माहिती येथील सरपंचाने पोलिसांना दिली. सात कप्पे असलेली एक पिशवी बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळली होती. त्यामध्ये प्लॅस्टिक टिफिन, पाच ग्रेनेड, ९ एमएम पिस्तूलची १०० काडतुसे, दोन किलो स्फोटके, रीमोट कंट्रोल उपकरण आणि एक स्विच आम्हाला या पिशवीत आढळले. हा टिफिन बॉम्ब फोमच्या आवरणात गुंडाळला होता, असे गुप्ता यांनी सांगितले.
दोन स्विचचा वापर
या प्रकरणी पंजाब पोलिस नॅशनल सिक्युरिटी गाडर्‌‌सची (एनएसजी) मदत घेत आहे. दोन किलो आरडीएक्सचा वापर करून हा अत्याधुनिक बॉम्ब तयार करण्यात आला आहे, अशी प्राथमिक माहिती येथे पोहोचलेल्या एनएसजी पथकाने दिली. निर्धारित वेळेवर स्फोट घडवून आणण्यासाठी यात स्विच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त या बॉम्बमध्ये यू आकाराच्या लोहचुंबकांच्या स्विचचा वापरही करण्यात आला आहे.
तसेच रिमोट सिग्नलची मदत घेण्यासाठी यात सर्किट बोर्डचा वापरही करण्यात आला. या बॉम्बला ऊर्जा देणारी ९ व्होल्टची बॅटरी आणि तीन डिटोनेटर्सही पिशवीत आढळले. या स्फोटकाचा वापर कोणत्याही लक्ष्याविरोधात करणे शक्य आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.
अतिरेक्यांकडून भाजपा किसान मोर्चाचा नेता, पत्नीची हत्या
श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांनी गोळीबार करून भाजपा किसान मोर्चाचा नेता आणि त्याच्या पत्नीची हत्या केल्याची माहिती अधिकार्‍यांनी आज सोमवारी दिली. अतिरेक्यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले गुलाम रसूल दार आणि त्यांची पत्नी जवाहरा बानो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती भाजपाचे नेते अल्ताफ ठाकूर यांनी दिली. अनंतनागमधील लाल चौकात अतिरेक्यांनी या दाम्पत्यावर हल्ला केला.
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. हे एक भ्याड कृत्य आहे. हिंसाचार करणार्‍यांना शिक्षा देण्यासाठी न्यायालयात खेचले जाईल. दार दाम्पत्याच्या मृत्युबाबत मी संवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी सांगितले.
हिजबुलच्या दोन अतिरेक्यांना अटक
श्रीनगर : सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीनच्या दोन अतिरेक्यांना अटक केली असून, पूंछ जिल्ह्यातील अतिरेक्यांचा अड्डा उद्‌ध्वस्त करीत, शस्त्र व स्फोटकांचा प्रचंड मोठा साठा जप्त केला.
यासिर हुसैन आणि उस्मान कादिर अशी अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांची नावे असून, हे दोघेही स्थानिक रहिवासी आहेत. त्यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला हिजबुलमध्ये प्रवेश केला होता. तांडर भागात ते आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक केली. त्यांच्याजवळून शस्त्र व काही स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.
दरम्यान, पूंछमध्ये जवानांनी अतिरेक्यांच्या गुप्त अड्ड्याचा शोध घेऊन त्यातून शस्त्र व स्फोटकांचा प्रचंड मोठा साठा जप्त केला. यात दोन एके-४७ रायफल्स, चिनी बनावटीचे तीन पिस्तुल, चार हॅण्डग्रेनेड्‌स आणि इतर स्फोटकांचा समावेश आहे.

Posted by : | on : 9 Aug 2021
Filed under : पंजाब-हरयाणा, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g