किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलराजस्थानच्या भाजपा प्रमुखांचे संकेत,
जयपूर, ९ ऑगस्ट – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलच भविष्यात भाजपात दाखल होऊ शकतात, असे संकेत राजस्थान भाजपाचे प्रमुख अब्दुल्लाकुट्टी यांनी दिले आहेत. त्यामुळे सचिन पायलट कॉंग्रेस पक्ष सोडतील, अशी शक्यता पुन्हा एकदा वर्तवली जात आहे. सचिन पायलट हे चांगले नेते आणि ते भविष्यात भाजपात येतील, असे मला वाटत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
मागील वर्षी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या विरोधात राजेश पायलट आणि त्यांच्या निष्ठावंत आमदारांनी बंड केल्यानंतर ते भाजपात दाखल होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सचिन पायलट भाजपात दाखल होणार नाहीत. राजस्थानातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करून कॉंग्रेसला सत्ता मिळवून देण्यासाठी पायलट यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत, असे कॉंग्रेसच्या नेत्यांनी सांगितले होते. कॉंग्रेसशासित राजस्थानमध्ये या महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि राजकीय नियुक्त्या होणार असून, त्या पृष्ठभूमीवर हा अंदाज वर्तवला जात आहे. सचिन पायलट आणि त्यांच्या नेतृत्वातील १८ आमदारांनी मागील वर्षी गहलोत यांच्या नेतृत्वाविरोधात केेलल्या बंडखोरीनंतर या दोन्ही गटांमधील मतभेदांनी तीव्र स्वरूप धारण केले आहे. त्या पृष्ठभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आपण उपस्थित केलेल्या मुद्यावर कॉंग्रेस नेतृत्वाने तातडीने लवकरात लवकर आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी सचिन पायलट यांनी केली आहे.