किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलतीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू,
जम्मू, १३ ऑगस्ट – जम्मूच्या राजौरी भागात गुरुवारी सायंकाळी भाजपा नेत्याच्या घरावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या मुलाचे नाव वीरसिंह आहे. तो भाजपा नेते जसबीरसिंह यांचा भाचा होता. या व्यतिरिक्त या हल्ल्यात आणखी चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
भाजपाचे राजौरी विभाग प्रमुख नेते जसबीरसिंह आपल्या कुटुंबासोबत घरीच असताना दहशतवाद्यांकडून त्यांच्या घरावर हा हल्ला करण्यात आला. ग्रेनेडच्या सहाय्याने घडवून आणलेल्या या हल्ल्यात जसबीरसिंह मात्र सुरक्षित राहिले.
दोन दिवसांपूर्वी अनंतनागमध्ये भाजपा सरपंच गुलाम रसूल दार आणि त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांकडून वारंवार धमक्या मिळत होत्या, मात्र सुरक्षेबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नसल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.
कॉंग्रेसने केला हल्ल्याचा निषेध
भाजपा नेते जसबीरसिंह यांच्या निवासस्थानावर गुरुवारी रात्री झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कॉंग्रेसने निषेध केला आहे. या हल्ल्यात त्यांचा तीन वर्षीय भाचा ठार झाला. कॉंग्रेसने त्यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी देखील केली. संपूर्ण राजौरी जिल्ह्यातही सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी जम्मू-काश्मीर कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींदर शर्मा यांनी केली.