किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलतालिबान्यांशी केली स्वातंत्र्य सैनिकांची तुलना, वंदे मातरम्लाही केला होता विरोध,
लखनौ, १८ ऑगस्ट – समाजवादी पार्टीचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी तालिबानची तुलना भारतीय स्वातंत्र्य सैनिकांशी केली. त्यांच्या या वक्तव्याबाबत उत्तरप्रदेश पोलिसांनी आज बुधवारी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य दोन लोकांनीही असेच वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर भादंविच्या कलम-१२४ (देशद्रोह) अंतर्गत त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले. तसेच त्याच्यांविरोधात कलम १५३ (सांप्रदायिक दंगल किंवा दोन समुदायांमध्ये तणाव किंवा शत्रुत्व निर्माण करणे) आणि कलम २९५ (कोणत्याही धर्माचा अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपाची टीकेची झोड
सपा खासदार शफीकुर यांनी देशासाठी बलिदान देणार्यांचा अपमान केल्याचे सांगत भाजपाने या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. हे विधान त्यांची मानसिकता दर्शवते. त्यांनी या अपमानास्पद वक्तव्यासाठी जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही भाजपाने केली आहे.
याच शफीकुर्रहमान बर्क यांनी राष्ट्रीय गान वंदे मातरम्ला विरोध करीत ते इस्लामच्या विरोधात असल्याचे सांगितले होते. तसेच ते मुस्लिमांनी गाऊ नये, असेही
ते म्हणाले होते, हे विशेष उल्लेखनीय.
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले की, जर कोणी असे वक्तव्य केले तर त्यांच्यात आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात काहीच फरक नाही. सपामध्ये काहीही होऊ शकते, असेही ते म्हणाले.