किमान तापमान : 25.19° से.
कमाल तापमान : 25.72° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 2.21 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.72° से.
24.15°से. - 28.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.8°से. - 28.3°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.7°से. - 28.55°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.02°से. - 28.98°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.35°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.29°से. - 29.02°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलचंदीगड, २७ जानेवारी – दिल्लीत झालेला हिंसाचार विशेषतः लाल किल्ल्यावर आंदोलकांनी घातलेला धुडघूस निंदनीय आहे. या घटनेमुळे देशाचा अपमान झाला. मान शरमेने खाली गेली, अशी संतप्त प्रतिक्रिया पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारचे कृषी कायदे चुकीचे असून, देशातील संघीय व्यवस्थेच्या विरोधातील आहे. आपण आंदोलक शेतकर्यांसोबत आहोत, पण आंदोलकांच्या या कृतीमुळे शेतकरी आंदोलन कमकुवत होईल. लाल किल्ला स्वतंत्र भारताचे प्रतीक आहे. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावा, यासाठी स्वातंत्र्य लढ्यात हजारो आंदोलकांनी प्राणांची आहुती दिली होती. महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढा लढला गेला होता. राष्ट्रीय राजधानीत मंगळवारी जे काही घडले, त्यामुळे माझी मान शरमेने खाली गेली, असे त्यांनी सांगितले.
हा प्रकार ज्यांनी केला, त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी तपास करावा. कोणत्याही राजकीय पक्षाची यात भूमिका असल्यास, त्याचा तपास होणे आवश्यक आहे. मात्र, गरज नसताना शेतकरी नेत्यांना लक्ष्य करण्यात येऊ नये किंवा त्यांचा छळ केला जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीतील दृश्ये धक्कादायक आहेत आणि असामाजिक तत्त्वांना सहन केले जाऊ शकत नाही, असे मंगळवारी सांगितले होते. शांततेने आंदोलन करणार्या शेतकर्यांची प्रतिमा या कृत्यामुळे खराब झाली आहे, असेही त्यांनी म्हटले होते.