किमान तापमान : 24.19° से.
कमाल तापमान : 24.59° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 3.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.19° से.
23.99°से. - 28.53°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.54°से. - 27.92°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.47°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.82°से. - 29.11°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.83°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.33°से. - 28.71°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलश्रीनगर, ३१ जानेवारी – अतिरेकी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या दोन, तर याची उपसंघटना असलेल्या लष्कर-ए-मुस्तफाच्या चार अतिरेक्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या अतिरेक्यांनी अनंतनाग आणि बिजबेहरा येथे हल्ला करण्याचा कट रचल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाला प्राप्त झाली होती. त्यानंतर लष्कराने विविध ठिकाणी तपास नाके स्थापन करून मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू केली, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली. बिजबेहरा येथील तपासनाक्यावर एका वाहनात दोन संशयित प्रवास करीत असल्याचे लष्कराला आढळले. त्यांनी वाहन थांबवले असता, यातील दोन जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लष्करी जवानांनी त्यांना अटक केली.
या दोघांचीही ओळख पटली असून, यातील इम्रान अहमद हजाम हा खानबाल येथील नाथपोरा येथील, तर इरफान अहमद अहंगर हा खानबाल येथील नांदपोराचा रहिवासी आहे. त्यांनी अलिकडेच लष्कर-ए-मुस्तफा संघटनेत प्रवेश केला होता, असे प्रवक्त्याने सांगितले. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य, दोन पिस्तूल, तीन मॅग्झिन आणि ११६ जिवंत काडतुसांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.
लष्कर-ए-मुस्तफा ही अतिरेकी संघटना अलिकडेच स्थापन करण्यात आली असून, पाकिस्तान नव्हे, तर जम्मू-काश्मिरातील असल्याचे भासवण्यासाठी ही अतिरेकी संघटना स्थापन केल्याचे, त्यांच्या चौकशीतून निष्पन्न झाले.
शोपियॉंमधील शरफपोराच्या हिदायत मलिक उर्फ हसनैन, लष्कर-ए-मुस्तफाचा स्वयंघोषित प्रमुख उमर उर्फ वाहिद खान, आफताब उर्फ अली भाईसोबत त्यांचा संबंध असल्याची माहिती चौकशीतून समोर आली. सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी आयईडी पेरण्यासाठी जागा शोधण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे या अतिरेक्यांनी चौकशीवेळी सांगितले. चौकशीत नावे समोर आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार अतिरेक्यांना विविध ठिकाणांवरून अटक करण्यात आली.
बिलाल अहमदकुमार, तौफिक अहमद, मुझमिल अहमद वानी आणि आदिल अहमद राथर अशी त्यांची नावे आहेत. जैशच्या अतिरेक्यांकडून दोन ग्रेनेड, एके रायफलींची ३० काडतुसे, एक किलो स्फोटक जप्त करण्यात आल्याची माहिती प्रवक्त्याने दिली.