किमान तापमान : 27.15° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 39 %
वायू वेग : 1.7 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
23.86°से. - 28.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 27.74°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.61°से. - 28.54°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.49°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल25.02°से. - 28.97°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादललखनौ, ६ फेब्रुवारी – धार्मिक शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मदरसांमधील व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आहे. बहुतांश मदरसे उत्तरप्रदेशातील असून, या मदरशांनी कोट्यवधी रुपयांचा सरकारी निधी मिळवल्याचा आरोप आहे. यापैकी अनेक मदरसे अवैध आहेत.
काही ठिकाणी शिक्षकांच्या भरतीमध्ये घोटाळा झाला आहे, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संख्येत गडबड आहे. माहितीच्या अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीमुळे हा सर्व गैरव्यवहार उघडकीस आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी केली जाणार आहे. उत्तरप्रदेशातील मिर्झापूर आणि आझमगडमधील ४०० मदरशांंवर या घोटाळ्याचा संशय आहे. यापैकी २५० मदरसे हे आझमगड जिल्ह्यातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी घोटाळा होत असल्याचा आरोप होत आहे. आता माहितीच्या अधिकारात दाखल झालेल्या अर्जामुळे या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास होणार आहे. या मदरशांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन भौतिक तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कागदावरची परिस्थिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामधील फरक समजू शकणार आहे. या संस्थांमध्ये शिकवणारे शिक्षक आणि शिकणारे विद्यार्थी यांचा पोलिस रेकॉर्ड देखील तपासला जाणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या कागदपत्रांचीही चौकशी होणार आहे. या संस्थांची कोणतीही इमारत किंवा जागा नाही. या सर्व मदरशांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून आजवर कोट्यवधी रुपयांचे अनुदान घेतले आहे. यामध्ये शिक्षकांच्या नावाखाली दर महिन्यात घेण्यात येणार्या लाखो रुपयांचा समावेश आहे.