किमान तापमान : 27.27° से.
कमाल तापमान : 28.42° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 52 %
वायू वेग : 4.93 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.42° से.
24.63°से. - 28.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.88°से. - 27.54°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.16°से. - 28.05°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.13°से. - 28.38°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.37°से. - 28.85°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.49°से. - 28.9°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलपरिवर्तन यात्रेत जे. पी. नड्डा यांचा घणाघात,
नाबाद्वीप, ६ फेब्रुवारी – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अहंकारी असून, त्यांनी राज्यातील शेतकर्यांना पंतप्रधान किसान योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवले आहे, अशी घणाघाती टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज शनिवारी येथे केली. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ममतांना निरोप देण्याचा जनतेचा ठाम निर्धार झाला आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बंगालच्या नाडिया जिल्ह्यातून भाजपाच्या परिवर्तन यात्रेचा शुभारंभ करताना नड्डा बोलत होते. ‘जय श्रीराम’च्या घोषणांवर त्यांना आलेल्या रागावर त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले. प्रशासनाचे राजकीयकरण आणि पोलिसांचे गुन्हेगारीकरण करण्यावर ममतांनी आपल्या सत्तेच्या सलग दोन कारकीर्दीत भर दिला आहे, असा आरोप त्यांनी केला.
ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीनंतर नमस्ते आणि टाटा करण्याचा निश्चय राज्याने केला आहे, असे त्यांनी महिनाभर राबविण्यात आलेल्या कृषक सुरक्षा अभियानाच्या समारोपावेळी सांगितले. यानंतर लगेच त्यांनी परिवर्तन यात्रेला हिरवी झेंडी दाखवली.
राज्यातील शेतकर्यांना पंतप्रधान किसान योजनेपासून वंचित ठेवून ममता यांनी त्यांच्यावर अन्याय केला. केवळ स्वतःचा अंहकार कुरवाळण्यासाठी त्यांनी या कल्याणकारी योजनेची राज्यात अंमलबजावणी केली नाही. शेतकर्यांनी या योजनेस मान्यता दिल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी दाखवली. राज्यातील ७० लाख शेतकर्यांना वार्षिक ६ हजार रुपयांच्या लाभापासून त्यांना वंचित ठेवले, असे त्यांनी सांगितले. मा, माटी, मानुष ही ममता बॅनर्जी यांची घोषणा आता हुकूमशाही, खंडणी आणि मुस्लिमांचे तुष्टीकरण यात परिवर्तित झाली आहे. राज्यातील जनतेचा त्यांनी विश्वासघात केला, अशी टीकाही त्यांनी केली. कृषक सुरक्षा सहभोजनात सहभागी होत नड्डा यांनी शेतकर्यांसोबत मालदा जिल्ह्यातील साहापूर येथे भोजन केले. मी येथे आलो, त्यावेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी माझे स्वागत करण्यात आले, पण हे शब्द ऐकल्यावर ममतादीदी का चिडल्या, याचे कारणच मला कळले नाही, असे त्यांनी सांगितले.
भव्य रोड शोचे आयोजन : तत्पूर्वी, मालदा येथे आयोजित करण्यात करण्यात आलेल्या रोड शोमध्ये नड्डा सहभागी झाले. या रोड शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. फौरा मोरे आणि गुरू रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्यापर्यंत एक किमी अंतराची ही रॅली काढण्यात आली. बंगालमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासोबत फुलांनी सजवलेल्या वाहनावरून नड्डा यांनी उसळलेल्या गर्दीवर झेंडूच्या पाकळ्यांचा वर्षाव केला.