किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.14° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.8 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.53°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.54°से. - 27.92°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.47°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.82°से. - 29.11°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.83°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.33°से. - 28.71°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलशोपियॉं, २४ जानेवारी – मागील वर्षी जुलै महिन्यात शोपियॉं जिल्ह्यात झालेल्या बनावट चकमकीत सहभागी असलेल्या लष्कराच्या कॅप्टन आणि दोन नागरिकांनी ठार केलेल्या तीन युवकांच्या मृतदेहांजवळ कोणती शस्त्रे ठेवली याबाबत माहिती दिलेली नाही तसेच त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा दावा पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात केला आहे. या चकमकीनंतर कोणती शस्त्रे जप्त केली याची माहिती कॅप्टन भूपिंदरसिंगने लष्कराच्या वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना दिलेली नाही, असे जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने मुख्य न्याय दंडाधिकार्यासमोर दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
१८ जुलै २०२० रोजी झालेल्या कथित बनावट चकमकीत शोपियॉंतील आमशिपुरा येथे तीन युवकांना अतिरेकी असल्याचे सांगून ठार करण्यात आले होते. चकमकीत ठार झालेले युवक निरपराध असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटल्यावर लष्कराने नंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे या तरुणांच्या मृतदेहांजवळ ठेवण्यासाठी बेकायदेशीरपणे शस्त्रांची व्यवस्था करण्यात आली. ही चकमक खरी असल्याचे भासवण्यासाठी तीनही आरोपींनी जाणीवपूर्वक पुरावे नष्ट केले किंवा त्यांनी हा गुन्हा केला असून, २० लाख रुपयांचे बक्षीस हडपण्यासाठी त्यांनी गुन्हेगारी कट रचून खोटी माहिती दिली, असे या आरोपपत्रात म्हटले आहे. मात्र, २० लाख रुपयांसाठी कॅप्टनने बनावट चकमक घडवून आणलेली नाही, असे लष्कराने स्पष्ट केले आहे. लढाईच्या परिस्थितीत किंवा कर्तव्य बजावताना केलेल्या कृतीसाठी लष्करी जवानांना रोख बक्षीस देण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचेही लष्कराने स्पष्ट केले आहे.