किमान तापमान : 26.83° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.59°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलअमृतसर, (६ जून) – ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त सुवर्ण मंदिरात खलिस्तानी घोषणा दिल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. श्री हरमंदिर साहिब येथील श्री अकाल तख्त येथे खलिस्तानच्या घोषणा देण्यात आल्या आणि खलिस्तानी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. शीख समुदायाला दिलेल्या संदेशात श्री अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी शीख समुदायाला श्री अकाल तख्तच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याचे आवाहन केले. सुवर्णमंदिरात अशी घटना घडू नये म्हणून पोलीस आणि प्रशासन सतर्क आहे. या घडामोडींवर सरकार बारीक लक्ष ठेवून असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
ऑपरेशन ब्लू स्टारचा आज ३९ वा वर्धापन दिन आहे. १९८४ मध्ये या दिवशी खलिस्तानी धर्मोपदेशक जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांची लष्कराने हत्या केली होती. या लोकांनी सुवर्णमंदिरात शस्त्रे घेऊन देशात दहशत माजवण्याचा कट रचला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार लष्कराने अमृतसरमध्ये एक मोठे ऑपरेशन केले, हे ऑपरेशन रात्रीच्या अंधारात केले गेले, म्हणून त्याला ऑपरेशन ब्लू स्टार असे नाव देण्यात आले. आज या कारवाईच्या ३९व्या वर्धापनदिनानिमित्त सुवर्ण मंदिरातील नापाक कृत्ये पुन्हा एकदा समोर आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्ण मंदिरात खलिस्तानी घोषणाबाजी करण्यात आली. यासोबतच खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेचे पोस्टर्स दाखवण्यात आले होते. यावेळी श्री अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह यांनी शीख समुदायाला संबोधित करताना सांगितले की, सध्या आपला समाज आणि धार्मिक संघटना दुभंगल्या आहेत, त्यांना श्री अकाल तख्तच्या नेतृत्वाखाली एकत्र करणे ही काळाची गरज आहे. अमृतसरमधील ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वर्धापनदिनानिमित्त पोलिसांनी श्री हरमंदिर साहिबच्या आसपास कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. येथे निमलष्करी दलाच्या चार कंपन्या आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.