Posted by वृत्तभारती
Friday, July 26th, 2024
– आता कोर्टात ही याचिका करण्यात आली, इस्लामाबाद, (२३ जुन) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेत त्यांना आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तुरुंगात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरविण्याची विनंती केली आहे. मंगळवारी एका मीडिया रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ’जिओ न्यूज’च्या वृत्तानुसार, रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद असलेल्या इम्रान आणि बुशरा यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तेथे उच्च स्तरीय सुविधा देण्याची विनंती...
26 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 23rd, 2024
– पीपीएमएल-एन, पीपीपी पक्षात आघाडीची घोषणा, लाहोर, (२३ फेब्रुवारी) – राष्ट्रीय निवडणूक झाल्यानंतर आठवडाभरापासून पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ (पीपीएमएल-एन), पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, आता दोन्ही पक्षात आघाडीवर एकमत झाले असून, कुणाला मंत्रिमंडळात किती जागा मिळेल, सत्तेत कुणाचा किती सहभाग राहील तसेच पंतप्रधानपदी कुणाची वर्णी लागणार यावर तोडगा निघाला आहे. पीपीएमएल-एन व पीपीपी आघाडी स्थापन करण्यावर एकमत झाले असून, लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार...
23 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 24th, 2023
– निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांच्या पक्षाला मोठा धक्का, इस्लामाबाद, (२३ डिसेंबर) – इम्रान खान पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ कडून ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह हिसकावून घेतले आहे. ‘बॅट’ पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांचे क्रिकेटवरील प्रेम प्रतिबिंबित करते. मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय ईसीपी खंडपीठाने निर्णय जाहीर करताना पीटीआयच्या पक्षांतर्गत निवडणुका ‘बेकायदेशीर’ घोषित केल्या. पीटीआयचे माजी सदस्य अकबर एस बाबर यांच्या याचिकेवर ११ पानांचा हा...
24 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
इस्लामाबाद, (०६ डिसेंबर) – पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या (पीटीआय) प्रमुख पदावरून हटवण्याच्या याचिकेवरील निर्णय सुरक्षित ठेवला आहे. तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. इम्रान खान ५ ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तोशखान्यातून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न जाहीर न केल्यामुळे ईसीपीने त्यांना या प्रकरणात अपात्र ठरवले होते....
6 Dec 2023 / No Comment / Read More »