Posted by वृत्तभारती
Tuesday, December 12th, 2023
नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – आसाम हा कधीही म्यानमारचा भाग नव्हता, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ते म्हणाले की, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आसाम हा म्यानमारचा भाग असल्याचा चुकीचा संदर्भ देताना त्यांनी इतिहासाचे चुकीचे पुस्तक वाचल्याचे सांगितले. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचे खंडपीठ आसाममधील बेकायदेशीर स्थलांतरितांशी संबंधित नागरिकत्व कायद्याच्या कलम ६ए च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्या १७ याचिकांवर सुनावणी करत आहे....
12 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 1st, 2023
– पोलिसांना सहकार्य करावे, नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – निधीच्या गैरवापराच्या प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तिस्ता सेटलवाड आणि तिचा पती जावेदला फटकारत, गुजरात पोलिसांना चौकशीत सहकार्य करावे, असा आदेश दिला आहे. तिस्ता सेटलवाड आणि जावेद चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे अतिरिक्त महान्यायाभिकर्ता एस. व्ही. राजू यांनी न्यायालयात सांगितले. यावर न्या. एस. के. कौल, न्या. सुधांशू धुलिया व न्या. पी. के. मिश्रा यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने उपरोक्त निर्देश दिला. तिस्ता...
1 Nov 2023 / No Comment / Read More »