किमान तापमान : 26.82° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 42 %
वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
24.56°से. - 29.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.74°से. - 27.77°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 28.69°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.61°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.44°से. - 28.39°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.18°से. - 28.76°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल– पोलिसांना सहकार्य करावे,
नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – निधीच्या गैरवापराच्या प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तिस्ता सेटलवाड आणि तिचा पती जावेदला फटकारत, गुजरात पोलिसांना चौकशीत सहकार्य करावे, असा आदेश दिला आहे. तिस्ता सेटलवाड आणि जावेद चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे अतिरिक्त महान्यायाभिकर्ता एस. व्ही. राजू यांनी न्यायालयात सांगितले. यावर न्या. एस. के. कौल, न्या. सुधांशू धुलिया व न्या. पी. के. मिश्रा यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने उपरोक्त निर्देश दिला. तिस्ता सेटलवाडला दिलेल्या अटकपूर्व जामिनाच्या विरोधात गुजरात सरकारने याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणात अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही, असे न्यायालयाने म्हटले. तिस्ता सेटलवाड आणि तिचा पती चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले. तिस्ताच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी मिश्रांच्या युक्तिवादाला विरोध करीत, आपला अशील चौकशीत सहकार्य करीत असल्याचा दावा केला. तिस्ताला अटकपूर्व जामीन मंजूर करताना, गुजरात उच्च न्यायालयाने ८ फेब‘ुवारी २०१९ रोजी दिलेल्या निकालातील टिप्पणी काढून टाकावी, या मागणीसाठी सेटलवाडने दाखल केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. जामिनाच्या टप्प्यावर केलेल्या कोणत्याही निरीक्षणाचा खटल्याच्या सुनावणीवर फारसा प्रभाव पडत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.