किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– भाजपा पुन्हा सत्तेवर आला नाही तर, त्याचे अतिशय प्रतिकूल परिणाम,
– अमेरिकन गुंतवणूक बँक जेफरीज एलएलसीकडून अंदाज,
नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – देशात पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे निकाल सर्वच क्षेत्रांसह देशातील शेअर बाजारांवरही परिणाम करीत असतात. निवडणुकीला आता काही महिनेच शिल्लक आहेत. त्यामुळे निवडणुकीचे निकाल काय असणार, सत्तापरिवर्तन होणार का, पुन्हा स्थिर सरकार येणार का, याबाबतचे कयास शेअर बाजारातही बांधले जात आहेत. अमेरिकन गुंतवणूक बँक जेफरीज एलएलसीकडून एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जेफरीज एलएलसीच्या इक्विटी स्ट्रॅटेजीचे जागतिक प्रमुख ख्रिस वुड यांच्या मते, नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले नाही तर, भारतातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण होईल. ही घसरण सुमारे २५ टक्के इतकी राहू शकते.
ख्रिस वुड म्हणाले की, भाजपा पुन्हा सत्तेवर आला नाही तर, त्याचे अतिशय प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून येतील. मोदी सरकारने जागतिक पुरवठा साखळीला आकर्षित करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. २००४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपाच्या पराभवानंतर शेअर बाजारात पुढच्या दोन दिवसांत २० टक्क्यांची घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर केंद्रात आलेल्या काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने आशियाई अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी तयार केलेली धोरणे कायम ठेवण्याचे आश्वासन दिले आणि पहिल्या दोन दिवसांचे नुकसान काही प्रमाणात सावरण्यात बाजाराला यश आले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.