किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 0.8 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24.32°से. - 27.61°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.31°से. - 28.55°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.68°से. - 29.16°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.99°से. - 29.58°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.16°से. - 28.88°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.62°से. - 29.11°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल-पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन,
-शेख हसीनांसोबत तीन प्रकल्पांचे लोकार्पण,
नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बुधवारी संयुक्तपणे आभासी स्वरूपात भारत-सहाय्यित तीन विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. बांगलादेशची भारतासोबतची भागीदारी ही ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. बांगलादेशातील अखौरा-अगरतळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लाईन, खुलना-मोंगला पोर्ट रेल्वे लाईन आणि रामपाल येथील मैत्री औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या युनिट-२ या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी भारत-बांगलादेश द्विपक्षीय सहकार्याचे यश साजरे करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा जोडले जाणे ही आनंदाची बाब आहे. आमचे संबंध सतत नवीन उंचीवर पोहोचत आहेत. नऊ वर्षांत आम्ही एकत्र काम केले आहे, जे याआधीच्या दशकातदेखील केले नव्हते, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
भारत आणि बांगलादेशातील तीन विकास प्रकल्पांच्या लोकार्पणावेळी शेख हसीना यांनी दोन्ही देशांमधील मैत्रीचे बंध दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेबद्दल मी कृतज्ञ असल्याचे सांगितले. या प्रकल्पात मोंगला आणि खुलना येथील विद्यमान रेल्वे नेटवर्क दरम्यान अंदाजे ६५ किलोमीटरच्या ब्रॉड-गेज रेल्वे मार्गाच्या बांधकामाचा समावेश आहे. अखौरा-अगरतळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक प्रकल्प भारत सरकारने बांगलादेशला दिलेल्या ३९२.५२ कोटी रुपयांच्या अनुदानात पूर्ण झाला आहे. भारत सरकारच्या सवलतीच्या कर्ज सुविधेअंतर्गत खुलना-मोंग्ला पोर्ट रेल्वे लाईन प्रकल्प पूर्ण झाला आहे. यामुळे व्यापाराला चालना मिळेल आणि आगरतळा ते कोलकाता, ढाका मार्गे जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा दृष्टिकोन बांगलादेशसार‘या आमच्या जवळच्या शेजारी मित्रासाठीही समर्पक असल्याचे म्हटले.
मागील नऊ वर्षांत भारताने विविध क्षेत्रातील विकास कामांसाठी अंदाजे १० अब्ज डॉलर्सची मदत दिली असल्याचा उल्लेख करीत मोदींनी भारत बांगलादेशचा सर्वांत मोठा विकास भागीदार असल्याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी मागील नऊ वर्षांत प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी आंतर्देशीय जलमार्ग विकसित केल्याचे सांगत, याच मार्गाने बांगलादेशातून त्रिपुराला निर्यातीचा मार्ग खुला झाल्याचे म्हटले आहे.
स्मार्ट बांगलादेशाला पाठिंबा
शेख हसीना यांचे आभार मानत स्मार्ट बांगलादेश पुढे नेण्यासाठी भारत पूर्ण पाठिंबा देत राहील, अशी ग्वाही नरेंद्र मोदींनी दिली. बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका जानेवारी २०२४ मध्ये होणार आहेत. त्या आधी विकास कामांना गती आली आहे. या कार्यक‘मात त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, डॉ. एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव, आर. सिंह, किशन रेड्डी उपस्थित होते.