किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आदी राज्यांच्या स्थापना दिनानिम्मित शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, “दिवसेंदिवस विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचणारा आपला मध्यप्रदेश अमृत काळामधील देशाचे संकल्प साकारण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. हे राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहावे अशी माझी इच्छा आहे.” “मध्यप्रदेश राज्याच्या स्थापना दिनानिमित्त माझ्या मध्यप्रदेशातील सर्व लोकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. दररोज विकासाची नवनवीन शिखरे गाठणारा आपला मध्यप्रदेश अमृत काळामधील देशाचे संकल्प साकारण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. हे राज्य प्रगतीच्या मार्गावर असंच निरंतर पुढे जात राहो, यासाठी माझ्याकडून शुभेच्छा”
“कर्नाटकच्या कन्नड राज्योत्सवानिमित्त, एक प्राचीन नवकल्पना आणि आधुनिक उपक्रमांची चौकट असलेल्या कर्नाटकचे चैतन्य आम्ही साजरे करतो. इथल्या लोकांच्या वागण्यात सदिच्छा आणि ज्ञानाचे मिश्रण असल्याने ते राज्य महान बनवण्याच्या अविश्रांत वाटचालीत महत्वाचे योगदान देतात. कर्नाटकची सतत भरभराट होत राहो, तिथे नवनवीन गोष्टी घडत राहो आणि ते सर्वांना प्रेरणा देत राहो. ” “आंध्र प्रदेश स्थापना दिनाच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी, या गतिमान राज्यातील जनतेला माझे मनःपूर्वक अभिवादन. त्यांची असामान्य प्रतिभा, दृढ संकल्प आणि चिकाटीने, आंध्र प्रदेशच्या लोकांनी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या उत्कृष्टतेचा ठसा उमटवला आहे. त्यांची निरंतर समृद्धी होत राहो आणि त्यांना सातत्याने यश मिळो यासाठी मी प्रार्थना करतो.
छत्तीसगड राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, इथल्या लोकांची चैतन्यशीलता या राज्याला एक खास राज्य बनवते. ते पुढे म्हणाले की “या राज्याची संस्कृती समृद्ध करण्यात आमच्या आदिवासी समुदायांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. या राज्याची गौरवशाली परंपरा आणि सांस्कृतिक वारसा सर्वांनाच आकर्षित करतो. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैभवाने भरलेल्या छत्तीसगडच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो”.
पंतप्रधान म्हणाले की, ” हरियाणा राज्याने कृषी आणि संरक्षण यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये देशासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.” हरियाणातील तरुणांनी नवोन्मेश क्षेत्रात केलेल्या प्रगतीबाबतही पंतप्रधानांनी प्रशंसा केली.