किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – ऑक्टोबर २०२३ मध्ये एकूण वस्तू आणि सेवा कर, जीएसटी महसूल संकलन १,७२,००३ कोटी रुपये झाले आहे, ज्यापैकी ३०,०६२ कोटी रुपये सीजीएसटी, ३८,१७१ कोटी रुपये एसजीएसटी, ९१,३१५ कोटी रुपये ( ४२,१२७ कोटी रुपये आयात मालावरील महसूल संकलनासह) आयजीएसटी आणि १२,४५६ कोटी रुपये (आयात मालावरील १,२९४ कोटी रुपयांच्या संकलनासह) उपकराद्वारे मिळाले आहेत.
सरकारने आयजीएसटीतून सीजीएसटी ला ४२,८७३ कोटी रुपये आणि एसजीएसटी ला ३६,६१४ कोटी रुपये अदा केले आहेत. नियमित जुळवाजुळवीनंतर (सेटलमेंटनंतर) ऑक्टोबर २०२३ मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटी साठी ७२,९३४ कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी ७४,७८५ कोटी रुपये आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये सकल जीएसटी महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १३% अधिक आहे. या महिन्यादरम्यान, देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल देखील गेल्या वर्षी याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा १३% जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सरासरी सकल मासिक जीएसटी संकलन आजमितीस १.६६ लाख कोटी रुपये असून मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ११% अधिक आहे.
खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलातील कल दर्शवितो. खालील तक्त्यामध्ये ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या प्रत्येक राज्याच्या जीएसटीच्या सेटलमेंटनंतरच्या महसूलाची राज्यवार आकडेवारी दर्शविली आहे.