किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन,
नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये कोळीकोडचा ‘साहित्य नगरी’, आणि ग्वाल्हेरचा ‘संगीत नगरी’ म्हणून समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कोळीकोड आणि ग्वाल्हेरच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, कोळीकोडच्या समृद्ध साहित्यिक वारशामुळे भारताची सांस्कृतिक गतिशीलता जागतिक पटलावर अधिक तेजाने चमकत आहे. तसेच, आपला सांगीतिक वारसा जतन करण्याची आणि तो समृद्ध करण्याची ग्वाल्हेरची वचनबद्धता अधोरेखित करून, जगभरात त्याचा प्रतिध्वनी उमटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या एक्स समाज माध्यमावरील मेसेजला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी म्हटले आहे: कोळीकोडचा समृद्ध साहित्यिक वारसा आणि ग्वाल्हेरचा मधुर वारसा आता प्रतिष्ठेच्या युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समाविष्ट झाल्यामुळे भारताची सांस्कृतिक गतिशीलता जागतिक पटलावर अधिक उजळून निघाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कोळीकोड आणि ग्वाल्हेरच्या जनतेचे अभिनंदन!
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही मान्यता साजरी करताना, आपला देश, आपल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे. ही प्रशंसा, आपल्या आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी आणि त्याची देवाण घेवाण करण्यासाठी समर्पित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सामूहिक प्रयत्न प्रतिबिंबित करते.
ग्वाल्हेर आणि संगीताचे विशेष नाते आहे. युनेस्कोचा हा सन्मान मिळणे, ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. ग्वाल्हेरने ज्या बांधिलकीने आपला सांगीतिक वारसा जपला आणि समृद्ध केला, त्याचे प्रतिध्वनी जगभरातून उमटत आहेत. माझी मनोकामना आहे की, या शहराची सांगीतिक परंपरा आणि इथल्या लोकांचा त्याबद्दलचा उत्साह आणखी वाढावा, जेणेकरून येणार्या पिढ्यांना त्यापासून प्रेरणा मिळेल.