Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
जम्मू, (१८ डिसेंबर) – जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सोमवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी ५३ सेकंदांनी हे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र लडाखमधील कारगिल असल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची खोली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर खाली असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता किंचित कमी असल्याने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भूकंपानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचे धक्के...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 22nd, 2023
– जीवितहानी किंवा नुकसानीचे वृत्त नाही, जकार्ता, (२२ नोव्हेंबर) – बुधवारी इंडोनेशियाच्या पूर्वेकडील भाग भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरले, मात्र या भागात जीवितहानी किंंवा नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र इंडोनेशियाच्या उत्तर मालुकू प्रांतातील टोबेलोच्या पश्चिमेला ९४ किलोमीटर (५८ मैल) भागात ११६ किलोमीटर (७२ मैल) खोलवर होते, असे इंडोनेशियाच्या हवामानशास्त्र आणि भूगर्भीयशास्त्र विभागाने सांगितले. त्सुनामीचा कोणताही धोका नाही, असेही सांगितले आहे. इंडोनेशिया...
22 Nov 2023 / No Comment / Read More »