किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– जीवितहानी किंवा नुकसानीचे वृत्त नाही,
जकार्ता, (२२ नोव्हेंबर) – बुधवारी इंडोनेशियाच्या पूर्वेकडील भाग भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरले, मात्र या भागात जीवितहानी किंंवा नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र इंडोनेशियाच्या उत्तर मालुकू प्रांतातील टोबेलोच्या पश्चिमेला ९४ किलोमीटर (५८ मैल) भागात ११६ किलोमीटर (७२ मैल) खोलवर होते, असे इंडोनेशियाच्या हवामानशास्त्र आणि भूगर्भीयशास्त्र विभागाने सांगितले. त्सुनामीचा कोणताही धोका नाही, असेही सांगितले आहे.
इंडोनेशिया हा एक विस्तीर्ण द्वीपसमूह असून येथे २७० दशलक्षाहून अधिक लोक राहतात. पश्चिम जावाच्या सियांजूर शहरात गेल्या वर्षी ५.६ तीव्रतेच्या भूकंपात ३३१ लोकांचा मृत्यू झाला होता आणि जवळपास ६०० लोक जखमी झाले होते. सुलावेसीमध्ये २०१८ च्या भूकंप व त्सुनामीमुळे सुमारे ४,३४० लोक मारले गेले. २००४ मध्ये अत्यंत शक्तिशाली हिंद महासागरातील भूकंपामुळे त्सुनामी आली व यात डझनभर देशांमध्ये २ लाख ३० हजारांपेक्षा जास्त लोक मारले गेले, त्यापैकी बहुतांश लोक इंडोनेशियाच्या आचे प्रांतातील होते. हे इंडोनेशियातील सर्वात प्राणघातक भूकंप ठरले.