Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
नवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अपेक्षा असतानाही काँग्रेसला जनतेने नाकारले. त्यामुळे १९८० नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यात काँग्रेसच्या हाती सत्ता राहिलेली नाही. हा हिंदी पट्टा काँग्रेसच्या हातून निसटला आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या पराभवाची सर्वाधिक चर्चा होत आहे. पक्षाच्या अंतर्गत अहवालात या राज्यांमध्ये विजयाचा दावा करण्यात आला होता. खुद्द राहुल गांधींनी मध्यप्रदेशात १३५ जागा मिळण्याचा दावा केला...
3 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
नवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी जाहीर झालेल्या मतमोजणीच्या ट्रेंडमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) तर तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे आणि दक्षिणेकडील तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. पाचव्या राज्य मिझोराममध्ये सोमवारी मतमोजणी होणार आहे. पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या ८४ जागा असून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकीची ही शेवटची...
3 Dec 2023 / No Comment / Read More »