Posted by वृत्तभारती
Monday, November 20th, 2023
– राजस्थानच्या जाहीर सभेत राजनाथसिंह यांचे प्रतिपादन, जयपूर, (२० नोव्हेंबर) – नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारताचा आंतरराष्ट्रीय स्तर उंचावला आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी सांगितले. राजस्थानच्या शाहपुरा येथे विधानसभा निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी परीक्षा पेपर फूट प्रकरण आणि कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर त्यांनी यावेळी जोरदार हल्ला चढविला. राजनाथसिंह पुढे म्हणाले, भारत आता कमकुवत राहिलेला नाही आणि आम्ही जे बोलतो ते...
20 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 12th, 2023
– महादेव अॅपवरून धरले धारेवर, रायपूर, (११ नोव्हेंबर) – भारताने कधीच कोणाच्या भूमीवर हल्ला करून ताबा घेण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु कोणी आपल्या देशावर हल्ला केला, तर त्यांना सोडणार नाही, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिला. याचवेळी त्यांनी छत्तीसगडमधील काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आणि येथे होणार्या धर्मांतरणावर जोरदार टीका केली. छत्तीसगडमधील सीतापूर, भरतपूर-सोनहाट आणि पाटण विधानसभा मतदारसंघांतील सभांना संबोधित करताना राजनाथसिंह यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर प्रहार करताना विकासात शून्य असल्याची टीका केली....
12 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 11th, 2023
नवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी सशस्त्र दलातील निवृत्ती वेतनधारकांना दिवाळीपूर्वी ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेअंतर्गत थकबाकीचा तिसरा हप्ता जारी करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेंतर्गत सशस्त्र दलातील कर्मचा-यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली होती. संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले की, स्पर्श प्रणालीद्वारे पेन्शन प्राप्त करणा-या संरक्षण निवृत्ती वेतनधारकांसाठी ओआरओपी रकमेचा तिसरा हप्ता दिवाळीपूर्वी जारी करण्याचे निर्देश संरक्षणमंत्र्यांनी मंत्रालयाला दिले आहेत....
11 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 6th, 2023
नवी दिल्ली, (०५ नोव्हेंबर) – केंद्र सरकारने मागील काही दिवसांत शेतकरी आणि रेल्वेच्या कर्मचार्यांना दिवाळीची भेट दिली. आता सशस्त्र दलांमध्ये तैनात असलेल्या महिला सैनिकांनाही दिवाळीची भेट दिली आहे. महिला सैनिकांना मातृत्व रजा दिली जावी, याबाबत सशस्त्र दलांनी दिलेला प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मंजूर केला. सुरक्षा दलातील महिला अधिकार्यांप्रमाणेच महिला सैनिकांनाही मातृत्व, बाळांचे संगोपन आणि मुलं दत्तक घेण्यासाठी रजा तसेच इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. सैन्यात तैनात असलेल्या महिलांच्या रजेबाबत...
6 Nov 2023 / No Comment / Read More »