किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.97° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.97° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०५ नोव्हेंबर) – केंद्र सरकारने मागील काही दिवसांत शेतकरी आणि रेल्वेच्या कर्मचार्यांना दिवाळीची भेट दिली. आता सशस्त्र दलांमध्ये तैनात असलेल्या महिला सैनिकांनाही दिवाळीची भेट दिली आहे. महिला सैनिकांना मातृत्व रजा दिली जावी, याबाबत सशस्त्र दलांनी दिलेला प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मंजूर केला. सुरक्षा दलातील महिला अधिकार्यांप्रमाणेच महिला सैनिकांनाही मातृत्व, बाळांचे संगोपन आणि मुलं दत्तक घेण्यासाठी रजा तसेच इतर सुविधा दिल्या जाणार आहेत.
सैन्यात तैनात असलेल्या महिलांच्या रजेबाबत संरक्षण मंत्रालयाने एक प्रस्ताव जारी केला. यात महिलांच्या रजेबाबत एक नियम तयार करण्यात आला आहे. अधिकारी असो अथवा सैनिक, आता सैन्यातील महिलांसाठी समान रजांची तरतूद केली जाणार आहे. या निर्णयामुळे सैन्यातील महिलांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होणार आहे.
प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
राजनाथसिंह यांनी सशस्त्र दलांतील महिला सैनिक, नाविक तसेच हवाई योद्ध्यांसाठी अधिकार्यांच्या बरोबरीने मातृत्व, बाल संगोपन आणि मूल दत्तक घेण्यासाठी बरोबरीने रजा देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या नवीन नियमानुसार सैन्यातील सर्वच महिलांना एक समान नियम लागू केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार नारी शक्तीला आत्मनिर्भर आणि सशक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. आता तीनही दलांतील महिला सैनिकांना अधिकार्यांच्या बरोबरीने रजा घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महिला अग्निवीरांच्या भरतीमुळे देशाच्या जमीन, सागरी आणि हवाई सीमांचे रक्षण करण्यासाठी महिला सैनिक, नाविक आणि हवाई योद्ध्यांच्या शौर्य, समर्पण आणि देशभक्तीमुळे सशस्त्र दल सक्षम होईल.